◻️ पाच लाखाच ऐवज चोरीला ; अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्यामुळे खळबळ
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात सोमवारी (१९ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास सुकेवाडी शिवारातील पावबाकी परिसरात चोऱ्या झाल्या असून यामध्ये ५ लाख ७० हजाराचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुकेवाडी शिवारात सोमवारी पहाटे ६ सशस्र चोरट्यानी घराना बाहेरून कड्या लावून सुकेवाडी शिवारात धूमाकूळ घातला. यावेळी शेजारील इतर घरांचे दरवाजे बाहेरून बंद करत शस्राचा धाक दाखवून चोऱ्या केल्या आहेत. यावेळी चोरट्यानी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये रक्कमेचा ऐवज चोरून पलायन केल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुनिल नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरुन गुरंन १०६३/२०२२ नुसार भादंवी कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.