◻️ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर धावली पहिली नागपूर - शिर्डी प्रवाशी बस
संगमनेर Live (शिर्डी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या प्रवाशी बसचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने रात्रौ १०.१५ वाजता संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी स्वागत केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांच्या हस्ते बसचे पुजन करण्यात आले. तसेच यात्रेचे आयोजक किरण पांडव व त्यांच्या समवेत आलेल्या ४७ प्रवाशांचा आणि बस चालकाचा पुष्पगुच्छ देवुन यथोचित स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संस्थानचे प्र. जनसंपर्क अधिकारी सुनिल शेजवळ, जनसंपर्क विभागाचे प्रशांत सुर्यवंशी, संरक्षण विभागाचे अरुण वाबळे, मंदिर पुजारी व संस्थान कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या पहिल्या प्रवासी बसला नागपूर विमानतळ येथून दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रवाना करण्यात आले होते. ही प्रवासी बस रात्रौ १०.१५ वाजता शिर्डी-कोपरगांव इंटरचेंजवर पोहोचली.
दरम्यान श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागताने सर्व प्रवासी भारावुन गेले होते. तसेच या सर्व प्रवाश्यांनी याबाबत आनंद ही व्यक्त केला आहे.