सत्तांतर झाल्यामुळे निळवंडे कालव्यांची कामे थांबली - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
◻️ आ. बाळासाहेब थोरात याच्यां हस्तें नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

◻️ तालुक्याच्या सर्वागीण विकास वाटचालीत भक्कम उभे राहा

संगमनेर Live | अडचणीतून मार्ग काढत मोठ्या कष्टातून संगमनेर तालुक्याने प्रगती साधली आहे. येथील सहकार व विकास हा राज्याला आदर्शवत ठरला आहे. सध्या संकटकाळ असला तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडत तालुक्याच्या विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. तालुक्याच्या यशामध्ये सर्वाचा वाटा असल्याने संगमनेर हा राज्यात दिमाखाने उभा आहे.

निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपले जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. बोगद्यांची कामे मार्गी लावली. मात्र २०१४ ते २०१९ काळात कालव्यांची कामे थंडावली होती. २०१९ नंतर पुन्हा कालव्याच्या कामाला मोठी गती दिली. मोठा निधी मिळवला. रात्रंदिवस काम सुरू होते. ऑक्टोबर २०२२ मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडे चे पाणी देण्यासाठी आपण काम सुरू ठेवले होते. मात्र जूनमध्ये सत्तांतर झाले आणि कालव्यांची कामे थांबली.

निळवंडे च्या कालव्यांची काम बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालवण्यासारखे आहे. मात्र हे कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. निळवंडे चे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतात गेले पाहिजे यासाठी आपला कायम आग्रह राहणार आहे.

तालुक्याच्या पाणी लढया संदर्भात हरिश्चंद्र फेडरेशनचे मोठे काम आहे. तर शेतकी संघाने आपला लौकिक निर्माण केला आहे. बँकिंग क्षेत्र सध्या अवघड झाले असून सर्व सहकारी संस्था या अत्यंत पारदर्शकपणे व देशाला आदर्शवत काम करत आहेत. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी यशस्वी पार पडून तालुक्याच्या विकास वाटचालीत भक्कम आणि उभे रहा असे आवाहन केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार पंढरी म्हणून ओळखला जात आहे. येथील प्रत्येक संस्थेने आपला वेगळा लौकिक निर्माण केला आहे. ही परंपरा नवी पदाधिकारी नक्कीच पुढे नेणार असल्याचे म्हटले आहे.

कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर अमृतवाहिनी बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन सुधाकर जोशी व व्हा. चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, व्हा. चेअरमन सुनील कडलग, हरिश्चंद्र फेडरेशनचे चेअरमन राजेंद्र गुंजाळ, व्हा. चेअरमन महेश मोरे, संगमनेर एग्रीकल्चर मार्केटिंग प्रोसेसिंग कंपनीचे चेअरमन ॲड. सुहास आहेर आणि व्हा. चेअरमन विठ्ठलदास आसावा यांच्यासह तीन निवृत्त कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !