◻️ संगमनेर तालुक्यातील समनापुर परिसरात पोलीसाची कारवाई
संगमनेर Live | कत्तलीसाठी आणलेल्या व चारा - पाण्याविना बांधून ठेवलेल्या ६० हजार रुपये किमंतीच्या ४ जिवंत जनावराची संगमनेर तालुक्यातील समनापूर भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली असून कासिम कुरेशी यांच्याविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके याना गुप्त बातमीदारामार्फत समनापूर शिवारात कत्तल करण्याच्या उद्देशाने जिवंत जनावरे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सपोनि दिनकर मुंडे, सफौ मनोहर शेजुळ, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळुंके, पोकॉ रणजीत जाधव, रोहित येमुल, सागर ससाणे व चापोहेकॉ उमाकांत गावडे यांचे पथक नेमुन कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.
सुचना मिळताचं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे संगमनेर पोलीस स्टेशनच्या मदतीने समनापूर शिवारात दाखल झाले होते. यावेळी चारा - पाण्याविना निर्दयतेने काही गोवंश जनावरे दावणीला बांधलेली दिसली. त्यामुळे तेथे चौकशी केली असता ही जनावरे कासिम कुरेशी (रा. भारतनगर, ता. संगमनेर) यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कुरेशी यांचा पोलीसानी शोध घेतला परंतू, तो आढळून न आल्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १०४६/२०२२ नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम ५ (अ), १, ९ सह प्राण्याना निर्दयतेने वागवणे कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव याच्यां मार्गदर्शन व सुचनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्या पथकाने केली आहे.