◻️ आश्वी बुद्रुक येथिल खा. सुजयदादा विखे पा. युवा मंच व विजयराव म्हसे मित्रमंडळाच्या उपक्रमाने वेधले लक्ष
◻️ समाजसेवी उपक्रमाचे आश्वी सह पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक
संगमनेर Live | जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांचा वाढदिवस संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला असून यावेळी खा. सुजयदादा विखे पा. युवा मंच व विजयराव म्हसे मित्रमंडळाकडून ऊस तोड मजुंराना ब्लँकेटचे वाटप करुन अनोख्या पध्दतीने सौ. विखे याना वाढदिवसाच्या शुभेच्छां देण्यात आल्या आहेत.
विखे पाटील कुटुंब हे राज्यात आपल्या समाजसेवेबरोबरचं विकासकामासाठी ओळखले जाते. त्यामुळेचं सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गुरुवारी आश्वी बुद्रुक येथिल खा. सुजयदादा विखे पा. युवा मंच व विजयराव म्हसे मित्रमंडळाच्या सदंस्यानी परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या गरीब मजुंराना उबदार कपड्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा सुत्य असा उपक्रम सुरु केला आहे.
या ब्लँकेट वाटप कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदंस्य विजयराव म्हसे, इंजि. अभिजित म्हसे, डॉ. अभिजीत गायकवाड, गोरख म्हसे, सतिष म्हसे, पंकज गायकवाड, कार्तिक म्हसे, सुभाष होडगर, जानकीराम गायकवाड, राजू वर्पे, बबन मांढरे, महेश गायकवाड, इंजि. बाळासाहेब सांगळे, रणजीत गायकवाड आदिसह ऊस तोड मजुंरासह त्याचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.
दरम्यान आश्वी बुद्रुक येथिल तरुणानी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सुरु केलेल्या समाज उपयोगी उपक्रमाचे आश्वी सह पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत असून परिसरातील प्रेत्येक गावातील तरुणानी असे उपक्रम राबवल्यास विखे पाटील कुटुंबाच्या समाजसेवेच्या कार्याला मोठे बळ मिळणार असल्याची भावना सर्वसमान्य नागरीकानी यानिमित्त व्यक्त केली आहे.