◻ हभंप दत्तगिरी महाराजाच्या दर्शनासाठी भाविकाची मांदियाळी
****
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र चौधरवाडी येथे माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या फिरत्या अखंड हरीनाम सप्ताहाचे २८ नोव्हेंबर ते सोमवार ५ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी हभंप दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तण व महाप्रसाद वाटपानतंर सप्ताहाची सांगता होणार आहे.
या फिरता अखंड हरीनाम सप्ताहाचे यदाचे १४ वे वर्षे असुन या वषीॅचा सप्ताहाचे नारळ चौधरवाडी ग्रामस्थांनी स्विकारल्याने पंचक्रोशीत उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या फिरत्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन ह.भ.प दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह कमिटी, तरुणाई व ग्रामस्थं केले आहे. या अखंड हरीनाम सप्ताहात मोठ्या प्रमाणात अन्नदान सुरु आहे. या सप्ताहकाळात महाराष्ट्रातील थोर किर्तनकार, गायक, वादक, गुणी कलावंतासह मान्यंवर मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने दिवसेंदिवस सप्ताहाला भेट देणाऱ्या भाविकाची गर्दी वाढत आहे.
या सप्ताहनिमित्त चौधरवाडी गावातील जेष्ठ मंडळी व तरुण प्रयत्न करत आहेत. किर्तन मंडप, भोजन मंडप, अखंड भजन मंडप, स्वयंपाक गृह, स्वयंपाक कोठडी , शमीना मंडप, वारकऱ्यासाठी राहण्याची व्यवस्था, वाहनांसाठी पार्किग व्यवस्था, स्वयंसेवकाची स्वतंत्र व्यवस्था याबातचे उत्कृष्ट नियोजन ग्रामस्थांनी केले आहे.
दरम्यान या सप्ताह काळात अमृततुल्य प्रवचन व महाप्रसादाचा लाभ संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक घेत असून हभंप दत्तगिरी महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.