◻️ नगर दक्षिण भागातील नागरीक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना भेटणार
संगमनेर Live (अहमदनगर) | राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर दक्षिण भागातील नागरीक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या भेटीसाठी रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे उपलब्ध असणार आहेत.
अशी माहीती जनसेवा संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
रविवारी दुपारी १२ वाजेपासून पालकमंत्री ना. विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नागरीक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना भेटून त्यांची निवेदन स्विकारुन प्रश्न जाणून घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.