संगमनेर Live | शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यावरील वचक, शाळेतील विविध स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूलच्या १९७३ च्या बँचचे, तर या माजी विद्यार्थ्यी मेळाव्यासाठी हे सर्व जण तब्बल ५० वर्षानी एकत्र आले होते.
१९७३ साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा नुकताच आश्वी बुद्रुक येथिल रयत संकुलात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेत शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. तर शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यामुळे सर्वाचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले होते.
त्यावेळी या विद्यार्थ्याना शिकवणारे शिक्षक एम. वाय. पठाण व जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर सह राज्याचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता नारायण घुगे व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कैलास बोऱ्हाडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन माधवराव गायकवाड, दिलीपशेठ तापडिया, सखाराम आघाव, प्रतापराव तांबे, सुरेश तांबे, शकुंतला बोऱ्हाडे, मिराबाई गायकवाड, चितांमणी विखे, नबाजी जोशी, मुरलीधर जऱ्हाड आदिनी केले होते. तर विनायक गायकवाड, सुरेश वाल्हेकर, साहेबराव शिदें, अशोक म्हसे, चद्रंभान आंधळे, कुंडलिक हिगें, अलका बोरा, सुशिला डेगंळे, मनोरमा लुणिया, म्हसे, जनाबाई निघुते, चद्रंकला शिदें, मधुकर मुन्तोडे, दिलिप दास्ताने, अशोक चाडंक, भानुदास तांबे, भाऊसाहेब वाणी, अशोक कहार, धोडींबा घोलप, रंभा तांबे, किसन मथाजी नागरे, वामन वाकचौरे, विलास नेहे, रावसाहेब मुखेकर आदि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यानतंर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी तालुका व जिल्ह्याबाहेर असले तरी ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात जे यश मिळवले त्यामागे शाळेचे संस्कार व शिक्षकाची शिस्त असल्याची भावना यावेळी व्यक्त केल्या असून शाळेच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्याना गोड जेवण व चादरीचे वाटप केले आहे.