संगमनेर Live | शिवसेनेसोबत युती करायला निघालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला की, सध्या भाजप आणि काँग्रेसकडून वेगळी खेळी सुरू आहे.
यामध्ये भाजपकडून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना तर काँग्रेसकडून आ. बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले जात आहे, असा दावा आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत केला आहे.
त्यांचा दावा किती खरा किती खोटा हे येणारा काळच ठरविल. मात्र सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा चर्चेत आहे.
दरम्यान यापुढे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून अहमदनगरमधीलच दोन नेत्यांची नावे येणार असतील तर अहमदनगरचा राज्याच्या राजकारणातील दबदबा अद्यापही कायम आहे, हेच यावरून दिसून येईल. असे जेष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यानी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.