◻️ विधानपरिषद, जिल्हापरिषद व पंचायत समिती यांच्या निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची निवडणूक लाबण्याची शक्यता
◻️ आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या मुदती ८ जानेवारीला संपणार
◻️ सरपंच व सदंस्य पदासाठी गुडघ्याला बांशीग बांधलेल्याना थोडी कळ सोसावी लागणार
संगमनेर Live | नुकत्याचं संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील पंचवार्षिक निवडणूका पार पडल्या असून विधानपरिषद निवडणूका जाहीर झाल्या असून जिल्हापरिषद व पंचायत समित्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. संगमनेर तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यात असलेल्या आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ८ जानेवारी रोजी मुदत समाप्त होणार असल्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका लांबण्याची शक्यता असल्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार की.? त्याना मुदतवाढ मिळणार याकडे नागरीकाचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायत सरपंचाची ८ जानेवारी रोजी मुदत संपत आहे. परंतू निवडणूकीसाठी आवश्यक असलेली प्रकिया शासन स्तरावर आद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे ८ जानेवारी नतंर आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार की.? ग्रामपंचायतीला मुदत वाढ मिळणार याबाबत विविध तर्कवितर्काना उधान आले आहे. त्यामुळे सरपंच व सदंस्य पदासाठी गुडघ्याला बांशीग बांधलेल्या उमेदवाराना थोडी कळ सोसावी लागणार आहे.
आश्वी बुद्रुक येथे लोकनियुक्त सरपंच पदाची जागा अनुसूचित जमातीच्या पुरुष उमेदवासाठी राखीव असून गावची लोकसंख्या ७ हजार व मतदार ४ हजार ८०० आहे. या ग्रामपंचायतीत सदंस्य संख्या १३ आहे. आश्वी खुर्द येथे लोकनियुक्त सरपंच पदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. गावची लोकसंख्या ४ हजार ३२२ व मतदार संख्या २ हजार ८०० आहे. या ग्रामपंचायतीत सदंस्य संख्या ११ आहे.
मागील पंचवार्षिकला डिसेंबर महिन्यात निवडणूका पार पडल्या होत्या. परंतू यावेळी जानेवारी महिना सुरु होऊनही या ग्रामपंचायत निवडणूकीबाबत कोणत्याही हालचाली प्रशासकीय स्तरावर होताना दिसत नाही. निवडणूकीसाठी आवश्यक असलेली प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडती व हरकती, प्रारुप याद्या व अंतिम मतदार याद्या तसेच त्यानतंर प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे.
या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८ जानेवारी रोजी मुदत संपत असलेल्या आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायतीबाबत निवडणूका लांबवणीवर पडण्याची चिन्ह असल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार की.? मुदतवाढ मिळणार याबाबत काय निर्णय होणार याबाबत मतदारासह नागरीकाना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान सध्या आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीवर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात याना मानणाऱ्या गटाचे वर्चस्व असून आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील याना मानणाऱ्या गटाचे वर्चस्व असल्याने या ग्रामपंचायत निवडणूका कधी जाहीर होणार याकडे नागरीकाचे लक्ष लागले आहे.