◻ शनिवारी महंत दत्तगिरी महाराजाच्या हस्तें अभिषेक तर रविवारी वेदांताचार्य बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे किर्तन
◻️ पंचक्रोशीतील भाविकाना दोन दिवसीय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन
◻️ पुंजाआईच्या ऐतिहासिक वस्तू भाविकाना दर्शनासाठी खुल्या
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ग्रामस्थांचे श्रध्दांस्थान असलेल्या बालब्रम्हचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी पूंजाआई मंदिर प्रागंणात दोन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आश्वी खुर्द ग्रामस्थानी दिली आहे.
पुजांआईने गोदावरी नदीकिनारी असलेल्या शिवमंदीरात १२ वर्ष तपश्चर्या केली होती. त्याचे जन्मगाव पुनतगाव (ता. नेवासे) असले तरी आश्वी खुर्द गाव हेच त्याची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. पुजांआईने गावात महादेव, मारुती व खंडोबा मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी महत्त्वाचे योगदान दिले. पुजांआईने आश्वी खुर्द गावामध्ये भक्तीची सुरवात केली, परंतू कधीही अधंश्रध्देला खतपाणी घातले नाही. देवगडचे मठाधीपती भास्कंरगिरी महाराज हे पुजांआईला आपली आई मानत होते. आश्वी खुर्द प्रमाणेचं पुजाईचे देवगड व बकुपिंपळगाव येथे भव्य मंदिर असून या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुजांआईची पुण्यतिथी साजरी केली जाते. यावेळी उपस्थित भाविकाना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते.
दरम्यान आश्वी खुर्द येथे शनिवार २१ जानेवारी रोजी सकाळी रामेश्वर उम्रेश्वर मठाचे मंहत ह. भ. प. दत्तगिरी महाराज यांचे हस्तें अभिषेक केला जाणार असून पुंजाआईचे चरित्र पारायण वाचन ह. भ. प. सुनील महाराज पवार हे करणार आहेत. तर यावेळी दुर्गासप्तशांती पाठ व आरती होणार आहे. सायंकाळी हरिपाठ व त्यानतंर शब्दप्रभु ह. भ. प. दिपकजी महाराज देशमुख (अकोले) यांचे सुश्राव्य किर्तण व त्यानंतर उपस्थित भाविकाना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी पारंपारीक पध्दतीने सवाद्यं पुंजाआई मातेची मिरवणूक काढली जाणार असून यानतंर हरिपाठ व संत महिपती महाराज यांचे वशंज वेदांताचार्य ह. भ. प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे अमृतूल्य किर्तण व त्यानतंर उपस्थित भाविकासाठी आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप आश्वी खुर्द ग्रामस्थाच्या वतीने केले जाणार आहे.
नुकतीचं आश्वी खुर्द ग्रामस्थानी नेवासे या ठिकाणी जाऊन ह. भ. प. भास्करगिरी महाराज यांची भेट घेऊन पुंजाआई च्या दोन दिवसीय सोहळ्याची माहिती दिली आहे. यावेळी भास्कंरगिरी महाराजानी सांगितल्याप्रमाणे ग्रामस्थानी पुंजाआईच्या मंदिरालगत असलेल्या घरामधील अडगळीत पडलेल्या ऐतिहासिक वस्तूची स्वच्छता करुन त्या वस्तू भाविकाना दर्शनासाठी मंदिरात ठेवल्या आहेत.