◻️ पेडगावच्या धर्मवीर गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली भेट
◻️ धर्मवीर गडावरील प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिराची केली पाहणी
संगमनेर Live (अहमदनगर) | श्रीगोंदा तालुक्याच्या पेडगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या धर्मवीर गडावरील महाराजांच्या स्मृतीस्थळाला आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह भेट दिली व शौर्य स्तंभास विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व छत्रपती संभाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास वारंवार पुसण्याचे आणि बदलण्याचे काम करणाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या दरम्यान त्यांनी धर्मवीर गडावरील प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिराची पाहणी देखील केली.
याप्रसंगी बाळासाहेब गिरमकर, भगवान आबा पाचपुते, दत्ता पानसरे, अजित जामदार, प्रताप पाचपुते, वैभव पाचपुते, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, डॉ. हूले, गणेश जिठे, नीलम खेडकर, भारती इंगवले, अशोक गोदडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.