साईच्या झोळीत २५ डिसेंबर ते दि. २ जानेवारी याकाळात १७.८१ कोटीचे दान

संगमनेर Live
0
◻️ संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांची माहिती

संगमनेर Live (शिर्डी) | श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दि. २५ डिसेंबर २०२२ ते दिनांक ०२ जानेवारी २०२३ याकालावधीत सुमारे ८ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १७.८१ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

जाधव म्‍हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त दि. २५ डिसेंबर २०२२ ते दि.२ जानेवारी २०२३ याकाळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत दानपेटीतून ८,७८,७९,०४८ रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ३,६७,६७,६९८ रुपये, डेबीट क्रेडीट कार्डव्‍दारे २,१५,१८,४९३ रुपये, ऑनलाईन देणगीव्‍दारे ०१,२१,०२,५३१ रुपये, चेक/डिडीव्‍दारे ९८,७९,९७३ रुपये व मनी ऑडरव्‍दारे ३,२१,६५३ रुपये अशी एकुण १६ कोटी ८४ लाख ६९ हजार ३९६ रुपये देणगी रोख स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने ०१ किलो ८४९ ग्रॅम (रुपये ९०,३१,१६७/-) व चांदी १२ किलो ६९६ ग्रॅम (रुपये ०६,११,४७८/-) देणगी प्राप्‍त झालेली आहे.

अशाप्रकारे विविध माध्‍यमातुन एकुण १७ कोटी ८१ लाख १२ हजार ०४१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.

या शिवाय याकाळात शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत सुमारे ८ लाख साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला असून यामध्‍ये जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश आहे. ऑनलाईन व सशुल्‍क दर्शन, आरती पासेसव्‍दारे १ लाख ९१ हजार १३५ साईभक्‍तांनी श्रींच्‍या दर्शनाचा लाभ घेतला असून याव्‍दारे ४ कोटी ०५ लाख १२ हजार ५४२ रुपये प्राप्‍त झालेले आहे. तसेच याकालावधीत श्री साईप्रसादालयात ५,७०,२८० साईभक्‍तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर १,११,२५५ साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ८,५४,२२० लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे ०१ कोटी ३२ लाख १९ हजार २०० रुपये प्राप्‍त झालेले आहे.

तसेच याकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे १,२८,०५२ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात १६२०७ साईभक्‍तांची अशी एकुण १,४४,२५९ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती. तसेच दि. ३१ डिसेंबर २०२२ व ०१ जानेवारी २०२३ या याकालावधीत १७१ रक्‍तदाते साईभक्‍तांनी रक्‍तदान केलेले आहे.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्राप्‍त झालेल्‍या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालय, श्री साईप्रसादालया मोफत भोजन, संस्‍थानच्‍या विविध शैक्षणिक संस्‍था, बाह्य रुग्‍णांना चॅरिटीकरीता, साईभक्‍तांच्‍या सुविधाकरीता उभारण्‍यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्‍यात येत असल्‍याचे ही राहुल जाधव यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !