◻️ कारखाण्याचा सहावा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू
◻️ कारखाण्याचे संचालक नंदन बिरोले यांच्या हस्तें झाले साखर पोत्याचे पुजण
◻️ श्रीरामपूर, राहुरी व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यानी गळीतासाठी ऊस द्यावा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथिल भक्तनगर याठिकाणी श्री गजानन महाराज साखर कारखान्याचा सहावा गळीत हंगाम यशस्वीरीत्या सुरु असून नुकतेचं कारखाना कार्यस्थळावर २ लाख ११ व्या साखर पोत्याचे विधिवत पुजण कारखाण्याचे संचालक नंदन रविद्रं बिरोले यांच्या हस्तें करण्यात आले.
या कारखाण्याने पाच गळीत हंगाम यशस्वीरित्या पुर्ण केले असून चालु सहाव्या गळीत हंगामात प्रतिदिन ३ हजार मेट्रीक टनाप्रमाणे गाळप सुरु आहे. तर कारखाण्याचा साखर उतारा १०.३४ इतका आहे. कारखाना गळीत हंगाम सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन, तोडणी व वाहतूक यंत्रणेची नियोजनपूर्वक काम पुर्ण झाले असून चालू हंगामात प्रतिदिन जास्तीत जास्त ऊसाचे गळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या गळीत हंगामातील २ लाख ११ व्या साखर पोत्याचे विधिवत पूजण कारखाण्याचे संचालक नंदन बिरोले यानी करुन हंगामातील यशस्वी कामगिरी सुरु असल्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंद असलेल्या व ऊस देण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतकऱ्याच्या सर्व उसाचे गाळप यशस्वीरीत्या करण्यात येणार असल्याची ग्वाही कारखाण्याने दिली आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी श्री गजानन महाराज साखर कारखाण्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले असून यावेळी हरिभाऊ गिते, बाबाजी सागर, भाऊसाहेब मंडलिक, गोरक्षनाथ डहाळे, अजित गुळवे, सचिन देशमाने, निलेश रणावरे, अनिल ल. वाकचौरे, विजय खरात, अब्बास फारुकी, अब्बास शेख आदिसह कारखाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
२०२२-२३ चा ६ वा गंळीत हंगाम यशंस्वीरित्या सुरु असून शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊस जपून कारखाना जगवत असतो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. श्रीरामपूर, राहूरी व संगमनेर तालुक्यातील जास्ती जास्त शेतकऱ्यानी आपला ऊस श्री गजानन महाराज साखर कारखान्याला दिल्यास त्याच्या घामाचा मोबदला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासनाकडून केला जाईल. असे श्री गजानन महाराज साखर कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रविद्रं बिरोले यानी म्हटले आहे.