◻️ ना. विखे पाटील यांच्याकडून प्रतापपूर येथिल सेवानिवृत्त शिक्षक डाॅ. बाळासाहेब आंधळे यांच्या सेवेचा गौरव
◻️ भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक व विद्यार्थ्यानचा संत्कार
संगमनेर Live | शिक्षणाची संधी मिळाल्यानंतर त्या मिळालेल्या संधीचे सोन करुन ज्ञानाने माणूस समृध्द झाला पाहीजे. त्यातुन कुटुंबाच्या बरोबरीने समाजाला ऊभे करण्याच कार्य केल पाहीजे. सेवापुर्तीनंतर माणुस निवृत्त होत नसतो तर, त्याच्यापुढे तरुण पिढी घडवत सुसंस्कृत समाज निर्माण करण्याची जबाबदारी निर्माण होत असते. असे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
प्रवरा शिक्षण संस्थेच्या आडगाव विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक व संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर गावचे रहिवासी असलेले डाॅ. बाळासाहेब सखाराम आंधळे यांच्या सेवापुर्तीनिमित्त संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर याठिकाणी आयोजित संत्कार समारंभात ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते अँड. बापुसाहेब गुळवे होते. प्रवरा बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, जेष्ठ नेते भगवानराव इलग, रंभाजी इलग, गुलाबराव सांगळे, संचालक कैलास तांबे, अँड. रोहीणीताई निघुते, सरपंच दत्तात्रय आंधळे, उपसरपंच शोभा आंधळे, बबनराव आंधळे, बाळासाहेब सांगळे, गजानन आव्हाड, सखाराम आंधळे, नंदकुमार राठी, रंगनाथ आंधळे, विलास आंधळे, आण्णासाहेब तांबे, अजय ब्राम्हणे, भाऊसाहेब जऱ्हाड, सिन्नर पंचायत समिती माजी सभापती बाळासाहेब वाघ, विजय चतुरे, पांडुरंग आंधळे, मुरलीधर आंधळे, माजी जिल्हाधिकारी सतिशराव जोंधळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित होते.
याप्रसंगी ना. विखे पाटील यानी, डॉ. बाळासाहेब आंधळे यानी शिक्षक म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करत एक चांगल्या मित्राच्या सेवापुर्ती समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, याचे खुप मोठे समाधान असल्याचे म्हणाले व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुंभेच्छां दिल्या आहेत. तर यावेळी ना. विखे पाटील यानी डॉ. बाळासाहेब आंधळे याचा सपत्नीक संत्कार केला.
यावेळी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक जनार्दन फड, स्व. कैलास दराडी, सुनील बळी, राजेंद्र माळी, बाळासाहेब आंधळे या सौनिकांचा तसेच आठवी इयत्तेत शिकत असलेल्या व विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या ओंकार आंधळे या विद्यार्थ्याचा ना. विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दरम्यान यावेळी डाॅ. बाळासाहेब आंधळे लिखीत स्मृतीगंध स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले असून याप्रसंगी पंचक्रोशीसह संगमनेर व राहता तालुक्यातील शिक्षक, मित्र परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट व ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते.