◻️ १८० लीटर आँईल नेले चोरुन ; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ.. डीपीची तांबे व ऑईलसाठी चोरी.?
संगमनेर Live | आपण बघतो की शेतातील अनेक गोष्टी या चोरीला जात असतात. मोटर, वायर किंवा शेतीचे इतर साहित्य देखील चोरीला जात असते. आता मात्र चोरटयांनी चक्क चालू विद्युत डीपी खाली उतरवून डीपीतील १८० लीटर ऑईल घेऊन चोरटे पसार झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द याठिकाणी ही घटना घडली आहे. यामुळे आता या डीपीवर विद्युत पुरवठ्यासाठी आवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना वीज टचांईचा सामना करावा लागणार आहे.
संगमनेर तालुक्यात चोरीच्या विविध घटना सद्या चर्चेचा विषय ठरत असताना चोरट्यांनी चक्क चालू 'विद्युत डीपी'च खाली उतरुन तिच्यातील १८० लीटर ऑईल चोरले आहे. त्यामुळे आता आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, शेतवस्तीवर राहणाऱ्यांवर अंधारात राहण्याबरोबरचं पिकाना पाणी कसे द्याचे असा प्रश्न ऊभा ठाकला आहे. याबाबत पोलीस आणि महावितरणच्या स्थानिक प्रशासनाला गावकऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात महावितरणचे बाह्य स्रोत कर्मचारी राहुल लबडे यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, रविवारी सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास दाढ खुर्द येथिल शेतकरी बापुसाहेब पर्वत यानी फोन करुन चारी नबंर ११ जवळ असलेल्या पर्वत वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर डीपीवरुन खाली पडल्यामुळे वीज प्रवाह खंडीत झाला असल्याची माहिती दिली होती.
त्यामुळे याबाबतची माहिती मी वरीष्ठ अधिकारी भंदाने याना देऊन घटनास्थळी दाखल झालो होतो. डीपीजवळ जाऊन पाहिले असता नट बोल्ट खोललेले दिसले व डीपीतील १२ हजार ८०० रुपये किमंतीचे १८० लीटर ऑईल चोरी गेले होते. त्यामुळे मी लाईनमन गोकुळ गपले, वायरमन ज्ञानदेव वाणी, गणेश गायकवाड याना घटनास्थळी बोलावून घेतले. यानतंर आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रंजिस्टर नबंर ३०/२०२३ नुसार भादंवी कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ...
याबाबत गावाचे सरपंच सतीष जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्युत डीपीवर आजूबाजूला राहणारे अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन आहे. त्यामुळे आता विद्युत डीपी नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसेच याबाबत प्रशासनाला माहिती दिली असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करवा अशी विनंती आम्ही करणार असल्याची माहिती त्यानी दिली असून यावेळी अमोल साळवे, बापूसाहेब पर्वत, भास्कंर वाडगे, बाबासाहेब वाडगे, संजय वाघ, शरद पर्वत, साईनाथ जोशी, स्वप्निल अंत्रे, नानासाहेब कापडी, दगडू पर्वत, एकनाथ कापडी, मोहन दातीर, सिध्दार्थ कदम, सोमनाथ साळवे आदि नागरीक उपस्थित होते.
परिसरात चर्चेचा विषय...
घरातील साधी वायर जोडायची म्हंटले की आपण इलेक्ट्रिशनचं काम करणाऱ्या व्यक्तीला शोधतो. मात्र या चोरट्यांनी चक्क चालू विद्युत डीपीच खाली घेऊन त्यातील ऑईलची चोरी केली आहे. त्यामुळे गावात आणि परिसरात या हटके चोरीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तर अनेकजण कुतुहलापोटी याठिकाणी येऊन चोरी कशी केली असेल याची पाहणी करत आहेत.
डीपीची तांबे व ऑईलसाठी चोरी.?
विद्युत डीपीमध्ये काही महत्वाचे धातू बरोबरचं ऑईल असते, ज्यात तांब्याच्या धातूचा प्रमाण अधिक असते. विशेष म्हणजे बाजारात तांब्याच्या धातूची किमंत अधिक आहे. एका विद्युत डीपीमध्ये तब्बल ५० हजारांचा तांब्याच्या कॉईल असतात. म्हणून चोरटे विद्युत डीपीला आपले लक्ष बनवत असतात. तसेच यापूर्वी सुद्धा अशाच काही चोरीच्या घटना सुद्धा समोर आलेल्या आहे. त्यामुळे आता या चोरांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.