◻️ मादीच्या प्रतिक्षेत वनविभाग घटनास्थळी तळ ठोकून
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील खळी येथिल साहेबराव मुकींदा तांबे याच्यां ऊस क्षेत्रात ऊसतोड सुरु असताना दोन बिबट्याचे बछडे सापडले असल्याची माहिती मिळाली असून बछड्याच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खळी येथिल साहेबराव मुकींदा तांबे यांची गट नबंर १५/४ मध्ये ऊसाची शेती आहे. यामध्ये रविवारी सकाळी संगमनेर साखर कारखान्याची ऊस तोड सुरु असताना ऊसाच्या बेटाडातून ओरडण्याच्या आवाजाबरोबर हालचाली ऊस तोड मजूंराना दिसल्या.
त्यामुळे त्यानी सावधरित्या पुढे जाऊन पाहिले असता दोन नवजात बिबट्याचे बछडे त्याना आढळून आले. याबाबतची माहिती साहेबराव तांबे याना ऊस तोड मजुंरानी दिल्यानतंर ते व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान तात्काळ या क्षेत्रातील ऊस तोड बंद करुन हा परिसर पुर्णतः निरमणूश्य करण्यात आला आहे. बिबट्याचे बछडे या ठिकाणाहून इतरत्र हालवल्यास बछड्याच्या विरहाने मादी बिबट्या हल्ला करण्याची भिती आहे. त्यामुळे बछडे या ठिकाणाहून न हालवता मादी बिबट्या हे बछडे घेऊन जाईल अशी व्यवस्था वनविभागाने केली असून वनविभागाचे काही कर्मचारी लाबूंन या बछड्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळाली आहे.