◻️ ‘कृतिशील गणित शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याने विद्यालयाकडून प्रा. बाळासाहेब गुळवे यांचा गौरव
◻️ अस्लम शेख यांच्याकडून वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्याना गणवेश वाटप
संगमनेर Live | राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीसह पत्रकार दिन नुकताचं राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथिल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात प्राचार्य राजेद्रं कोबांरणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी राजमाता जिजाबाई माँसाहेब व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मान्यंवरानी अभिवादन केले. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेद्रं कोबंरणे, कवी यशंवत पुलाटे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख यमन पुलाटे, पत्रकार संजय गायकवाड, पत्रकार अनिल शेळके, अस्लम शेख, पर्यवेक्षक शिवाजी दळवी, मुख्याध्यापक आनंद कोल्हे, महाविद्यालयाचे समन्वयक राजकुमार सावंत, जेष्ठ शिक्षक संजय उंबरकर, क्रीडा शिक्षक दादासाहेब तुपे, सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब इलग आदि यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी राजमाता जिजाऊ माँसाहेब व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला मान्यंवरानी उजाळा दिला. पत्रकार दिनानिमित्त यमन पुलाटे, संजय गायकवाड व अनिल शेळके यांचा विद्यालयाने गौरव केला. तर ‘कृतिशील गणित शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याने विद्यालयाकडून प्रा. बाळासाहेब गुळवे यांचा मान्यवंराच्या हस्ते संत्कार करुन सन्मान करण्यात आला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते अस्लम शेख यानी त्याच्यां वाढदिवसानिमित्त विद्यालयातील गरीब विद्यार्थ्याना गणवेश वाटप करत आपले सामाजिक दायित्व पार पाडले आहे.
दरम्यान यावेळी आयोजित कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक संजय उंबरकर, बाळासाहेब इलग यानी केले. याप्रसंगी शिक्षक राजेद्रं घोगरे, अनिल पावडे, पवार, अनर्थे, भोसले, हळणोर, शिक्षिका पुजा तांबे, शितल तांबे, शालिनी तांबे, प्रिती तांबे, अश्विनी तांबे, जयश्री डेगंळे, नंदिनी फड, सोनवणे, बर्डे, घोलप, औताडे, डांगे, आहेर, ब्राम्हणे, गिते, कुलकर्णी, धावणे, शंकर शिदें, दादू पांळदे, संतोष पुलाटे आदिसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.