◻️ बिझणेस मँनेजमेटच्या शिक्षणासाठी परदेशी जाणीरी गावातील पहिलीचं मुलगी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथिल रहिवासी व व्यावसायानिमित्त मुबंई येथे राहत असलेले उद्योजक बापूसाहेब सांगळे याची कन्या आदीश्री बापूसाहेब सांगळे ही उच्च शिक्षणासाठी नुकतीचं इंग्लंडला रवाना झाली असून शेडगाव येथून परदेशात मँनेजमेटच्या शिक्षणासाठी जाणारी आदीश्री ही बहुधा पहिली मुलगी असल्याने पंचक्रोशीतून तिचे कौतुक होत आहे.
बी. जे. ऑटोमेशनचे सर्वेसर्वा बापूसाहेब सांगळे यांची आदीश्री ही मोठी कन्या आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कल्याण या ठिकाणी झाले असून तिने बिझनेस मँनेजमटचा अभ्यास करण्यासाठी इंगलंड स्थित ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. नुकतेची ती इंग्लंड कडे पुढील शिक्षणासाठी रवाना झाली आहे.
दरम्यान आदीश्रीच्या या यशाबद्दल शेडगाव सह पंचक्रोशीतील ग्रामस्थं, नातेवाईक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यंवरानी बापूसाहेब सांगळे व आदीश्रीचे अभिनंदन केले आहे.