◻️ इलेक्ट्रिक सामान, पीव्हीसी पाईप, कॉम्प्युटर साहित्य, मुरघास बॅग तसेच फर्निचर जळून खाक
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील शिवनंदन एंटरप्राइजेस या दुकानाला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुकानातील इलेक्ट्रिक सामानासह, पीव्हीसी पाईप, कॉम्प्युटर साहित्य, मुरघास बॅग व शेतीसाठी लाईट लागणारे साहित्य तसेच फर्निचर जळून खाक झाले असून एकूण २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ही भयावह आग लागतात दुकानाचे मालक संदीप शिंदे यांनी तातडीने गावातील गावकऱ्यांची मदत मागितली. गावचे उपसरपंच अरुण जोंधळे यांनी त्वरित सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व नगरपालिकेची अग्निशामक बोलून सदर आग विझवण्यासाठी मोठी मदत केली. गावातील सर्व तरुणांनी या कामी अत्यंत पुढाकार घेत संदीप शिंदे यांना मोलाची मदत केली.
घटनेची माहिती मिळतात तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी जोंधळे, भीमाशंकर जोंधळे, हनुमंत जोंधळे, दादासाहेब जोंधळे, रंगनाथ बिडवे, योगेश भोसले, अशोक मारुती वायकर, सोमनाथ जोंधळे, संकेत जोंधळे, महेश जोंधळे, चंदू वायकर, ग्रामसेवक बांगर, भीमाशंकर जोंधळे आदींसह विविध तरुणांनी मदत केली.
या घटनेने कोकणगाव ग्रामस्थांमध्ये मोठी हळद व्यक्त होत असून अत्यंत गरिबीतून व चिकाटीने उभा केलेल्या या तरुणांनी व्यवसाय शॉर्टसर्किसमुळे राख झाला आहे. त्यामुळे या तरुणाचे जीवन अत्यंत हलकीचे झाले असून याला तातडीने शासन दरबारी मदत मिळावी अशी मागणी उपसरपंच अरुण जोंधळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.