◻️ पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल व ब्रिलियंट बर्डस स्कूल लोणीचे वार्षिक संम्मेलन उत्सहात
◻️ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कन्या अनिशा यांनी गायन केलेल्या रामरक्षाने कार्यक्रमास प्रारंभ
संगमनेर Live (लोणी) | शिक्षणासोबतचं भारतीय संस्कृतीचे मुल्य जपण्याचे काम प्रवरेच्या शैक्षणिक संकुलातून होत आहे. शिक्षण, सुप्त कलागुणांची जोपासना, संस्कृतीचे ज्ञान आणि बालसंस्कार यातून आदर्श पिढी घडविण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सोबत संस्था ही विविध उपक्रम राबवत असते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल व ब्रिलियंट बर्डस स्कूल लोणीच्या वार्षिक संम्मेलन कार्यक्रात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, स्कूलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील, साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डाॅ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, प्रवरा कन्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या भारती देशमुख, प्रा. किरण चेचरे, प्राचार्या दीपाली गिऱ्हे, प्रा. निर्मळ यांच्या सह पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
बाल मनावर संस्काराची गरज आहे असे सौ. विखे पाटील यांनी सांगून आज कुंटुंब हे लहान झाले आहे. एकत्रित कुटुंबपद्धती बंद होऊन सर्वजण धावपळीचे जीवन जगत आहे. यामुळे आज संस्कारची गरज आहे. हेच संस्कार देण्याचे काम या स्कुलच्या माध्यमातून होत आहे. इंग्रजी शिक्षणांसोबत भारतीय संस्कृती आई-बाबा, आजी आजोबा विविध महापुरुष, संताचे विचार, विविध सण-वार उत्सव याद्वारे मुलांवर संस्कार होत असतात आणि हेच काम या स्कुलद्वारे होत आहे. असे सांगून पालक विद्यार्थी शिक्षक आणि पालक यातूनच आदर्श विद्यार्थी घडणार आहे असे. सौ. विखे पाटील यांनी सांगितले.
डॉ. प्रदिप दिघे यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध गाणी, स्त्रोत पठण करत पालकांची मने जिंकली. यावेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कन्या अनिशा यांनी गायन केलेल्या रामरक्षाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी बालगोपाळांनी सादर केलेल्या विविध साकृतिक कार्यक्रमास मान्यवरांसह पालकांनी भरभरुन दाद दिली.