◻️ श्री श्री १००८ महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंदजी महाराज सरस्वती यांच्या हस्तें पूजाविधी
◻️ युवा नेते विजयराव हिगें व सहकाऱ्यानी दिले मंदिर उभारणीत बहुमुल्य योगदान
संगमनेर Live | मानव कल्याण, समाज सुधारणेचे व्रत व श्री संत सेना महाराज यांच्या विचाराच्या प्रभावातून अध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होऊन जन कल्याणाचा प्रसार व्हावा या उदात्त हेतुने संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज व विठ्ठल रुख्मिणी यांच्या नुतन मंदिराचे कलश पुजन व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे गुरुवार दि. २ व शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत सेना महाराज व विठ्ठल रुख्मिणी मंदिराची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या धार्मिक पूजाविधीसाठी श्री श्री १००८ महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंदजी महाराज सरस्वती (शिर्डी) तसेच राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. मुर्ती मिरवणूक काढली जाणार असून शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. विधिवत मुर्ती प्राणप्रतिष्ठा व अमृतूल्य किर्तण व त्यानतंर उपस्थित भाविकाना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
दरम्यान या मंदिर उभारणीत आश्वी बुद्रुक येथिल सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते विजयराव हिगें व त्याच्यां सहकाऱ्यानी बहुमुल्य असे योगदान दिले असून पंचक्रोशीतील नागरीकानी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ संलग्न सलुन व ब्युटीपार्लर असोसिएशन आश्वीच्या वतीने करण्यात आले आहे.