◻️ आश्वी खुर्द शिवारातील घटनेने परिसरात खळबबळ
◻️ चाळीस हजार रुपये रोख व एक तोळ्याची सोन्याची अंगठी घेऊन पोबारा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात येथिल सयाजी उमाजी मुके (वय - ७५) या जेष्ठ व्यक्तीला ७० हजार रुपयाला पोलीस असल्याची बतावणी करुन एका भामट्याने गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी लुटल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सयाजी उमाजी मुके हे आश्वी खुर्द - शिबलापूर रस्त्याने चालले होते. यावेळी भैरवनाथ मंदिरा जवळ त्याना अडवून काळ्या रंगाच्या मोटर सायकल वरुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी केली.
यावेळी त्याने या ज्येष्ठ व्यकक्तीची तपासणी करण्यासाठी त्याना खिशातील सर्व सामान बाहेर काढण्यास सांगितले. याप्रसंगी त्याने मोठ्या चालाकीने त्यांच्याकडील चाळीस हजार रुपयाची रोख रक्कम व एक तोळ्याची सोन्याची अंगठी असा ऐकुन सुमारे ऐशी हजार रुपयांचा ऐवज काढून घेऊन पोबारा केला आहे.
यानतंर मुके याना आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले व त्यानी आश्वी पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आश्वी पोलीस करत असून या तोतया पोलीसाच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन पोलीसापुढे ऊभे ठाकले आहे.