◻️ श्री गजानन महाराज साखर कारखाण्यावर भाविकांची मांदीयाळी
◻️ दिड्यांसह वारकऱ्यानी लयबध्द केलेल्या टाळ मृदूंगाच्या गजराने भक्तनगरचा परिसर दुमदुमला
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर शिवारातील भक्तनगर येथिल श्री गजानन महाराज शूगर कारखान्याच्या प्रांगणात असलेल्या भव्य अशा श्री गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कारखाण्याचे संस्थापक रविंद्र बिरोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रगट दिन सोहळा साजरा करण्याचे हे ८ वे वर्ष असून या निमित्ताने भक्तनगर येथे तालुक्यातील पुर्व व पठार भागातील गावांसह राहुरी, नेवासे, श्रीरामपूर, वैजापूर व राहाता तालुक्यातून हजारोच्या संख्येने भाविकाचा महासागर लोटल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. श्री गजानन महाराज शूगर कारखान्याचे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले यांनी या पठार भागाच्या माळरानावर कारखान्यांची उभारणी करतानाचं श्री गजानन महाराजाचे स्मरण करत प्रथमता भव्य अशा श्री संत गजानन महाराजाच्या मंदिरांची उभारणी केली होती. तेव्हापासून प्रगट दिन सोहळा या माळरानावर साजरा करण्यात येत आहे. या वर्षी प्रगट दिन सोहळ्याकरिता जवळपास सात दिंड्यासह शेकडों भाविक भक्त कारखानास्थळी दर्शनाकरिता दाखल झाले होते.
यावेळी ताहराबाद, कोल्हार खुर्द, साकुर, बिरेवाडी, वारणवाडी, देसवडे, वरवंडी, माध्यमिक विद्यालय, शेळकेवाडी, कौठे-मलकापुर आदि ठिकाणाहून दिंड्या या ठिकाणी आल्या होत्या. यावेळी वारकऱ्यानी लयबध्द टाळ - मृदुगांचा गजर करत परिसर दुमदुमुन सोडला होता. याप्रसंगी ‘गण गण गणात बोते’ हा भक्तीचा गजर करण्यात आला असून संत गजानन महाराज मंदिर व प्रांगणात दोन दिवस पारायण, अभिषेकसह अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले.
सोमवारी सकाळी ‘गण गण गणात बोते’ चा गजर करत पालखीची मिरवणुक काढण्यात आली होती. आरतीने कार्यक्रमांची सुरुवात होवून ११ वाजता आळंदी येथील गुरूकृपा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संजयजी महाराज ढाकणे यांच्या सुंदर असे काल्याचे किर्तन व यानतंर उपस्थित भाविकाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमप्रसंगी श्री गजानन महाराज शूगर लि. चे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले, संचालिका सौ. अश्विनीताई बिरोले, शंतनु रविंद्र बिरोले, रामदास शेजुळ, हरीभाऊ गिते, सुभाष कोळसे, बाबाजी सागर, बाळासाहेब कोंडाजी खेमनर, भाऊसाहेब शेजुळ, दादापाटील गुंजाळ, तान्हाजी बागुल, नाना धुळगंड, ह.भ.प. उषाताई वाघ, सुभाष पेंडभाजे, योगेश खेमनर, गुलाबराजे भोसले, भाऊसाहेब मंडलिक, अजित गुळवे, गोरक्षनाथ डहाळे, सचिन देशमाने, निलेश रणावरे, अब्बास फारुकी आदिसह कारखाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच पंचक्रोशीतून आलेले मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.