◻️ सात्रळ महाविद्यालयात शेतकरी मेळावा उत्सहात संपन्न
◻️ झाडे लावून पृथ्वीचे तापमान कमी करा
◻️ ८ जूनला पावसाचे आगमन होऊन २२ जुन ला सर्वत्र पडणार
संगमनेर Live (झरेकाठी) | हवामानवर आधारित शेती करतांना पर्यावरणाचा ही विचार करा, निसर्गाला न घाबरता निसर्ग समजून घेत शेती करा. यापुढे शेती समोर संकटे असली तरी तो शेतकरी हा राजा आहे आणि राजाच असणार आहे. झाडे लावून पृथ्वीचे तापमान कमी करा असे प्रतिपादन हवामान तज्ञं आणि अभ्यासक पंजाबराव डख यानी केले.
राहुरी तालुक्यातील लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सात्रळच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
आयोजित शेतकरी मेळाव्यात पंजाबराव डख बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमुंगे, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संचालक अप्पासाहेब दिघे, सुभाषराव अत्रे, विखे पाटील कारखान्याचे संचालक बाबुराव पलघडमल, सुभाष अंञे, बाळासाहेब दिघे, जे. पी. जोर्वेकर, दिलीप डुक्रे, नानासाहेब गागरे, रंगनाथ दिघे, सरपंच सतीषराव ताठे, प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शन करताना पंजाबराव डख म्हणाले की, शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या विशेषात न जाता निसर्गातील चढ उतार समजून घेत शेती व्यवसाय करा. प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा निसर्गातूनच मिळत असतो. पूर्वेकडून वारे आले तर दुष्काळ पडत नाही. ज्यावर्षी गावरान आंबे कमी असतात त्यावर्षी पाऊस जास्त येतो.
पृथ्वीचे वाढते तापमान याविषयी चिंता व्यक्त करतांना तापमान कमी होण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज असल्याचे पंजाबराव डख यानी सांगून हवामानाचा अंदाज व्यक्त करतांना यावर्षी ८ जूनला पावसाचे आगमन होऊन २२ जुन ला सर्वत्र पाऊस पडले असे सांगितले. शेतकऱ्यांनी २६ जुन पर्यंत पेरणी करावी. शेतकऱ्यांचे नुकसान कमी व्हावे यासाठी हवामान अंदाज दिला जातो. असे सांगुन पावसाचा अंदाज कसा घेतला जातो याविषयी पंजाबराव डख यानी मार्गदर्शन केले.
प्रारंभी उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी प्रास्ताविकांत शेतकरी मेळावाचा हेतु विषद केला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुष मंत्रालय आणि महाविद्यालयाच्या वतीने औषधी रोपांचे वितरण उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नवनाथ शिंदे आणि गायत्री म्हस्के यांनी तर आभार डॉ. दिपक घोलप यांनी मानले.
थंडी कमी होऊन पाऊस येणार..
आपल्या परिसरात १८ फेब्रुवारी पासून ऊन वाढणार आहे. २५ फेब्रुवारीला पर्यत थंडी असेल. २६ फेब्रुवारीपासून उन्हाळा सुरू होऊन २८ ते ३ मार्च पर्यत पाऊस राहील असा १५ दिवसाचा अंदाजही व्यक्त केला आहे.