◻️ साडेचार तोळे सोन्यासह ३८ हजाराची रुक्कम चोरीला
◻️ आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; चोऱ्याचे सत्र वाढले
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांन मध्ये काही दिवसांपासून चोरट्यानी धुमाकूळ घातला असून गुरुवारी रात्री वरवंडी येथील बंद घराचा दरवाजा तोडुन सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा सुमारे १ लाख २६ हजाराचा ऐवज चोरली गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी शिवारात राहत असलेल्या रोहीदास चिमाजी दिघे यांच्या राहत्या बंद घराचे गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडुन घरातील लोखंडी कपाटाचा लाॅकर मधील आडीच तोळे वजनाची मोहनमाळ, दिडतोळे वजनाची साखळी, चार ग्राम वजनाचे कुडके व नथ असे एकुण साडेचार तोळे सोने व ३८ हजार रुपये रोख असा एकून सुमारे १ लाख २६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे.
याबाबत आश्वी पोलीस स्टेशनला रोहीदास दिघे यांनी गुन्हा रजिस्टंर नंबर ४८/२०२३ नुसार भादंवी कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावानमध्ये चोरीच्या घटनांनमध्ये वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाला या गुन्ह्याचा तपास लावण्यात अपयश येत असून या चोराचा बंदोबस्त करण्याचे मोठे आवाहन पोलीसांपुढे ऊभे ठाकले आहे.