◻️ संगमनेर पोलीस ठाण्यात कुटुंबियाकडून हारवल्याची तक्रांर
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील झोळे येथिल महेश किसन येवले (वय - २९) हा तरुण २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता असून हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रांर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
यामध्ये कोळवाडे आश्रम शाळेत नोकरी करत असलेले महेश येवलेचे काका संपत मालुंजकर यानी पोलीसाना दिलेल्या माहितीनुसार त्याचे साडू किसन मारुती येवले (रा. झोळे, ता. संगमनेर) यांचा महेश हा मुलगा आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून मानसिक आजाराने महेश त्रस्त असल्याने त्याच्यांवर उपचार सुरु आहेत. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महेश हा काका संपत मालुंजकर (रा. गणेश विहार फेसटू मालदाड रोड, घुलेवाडी) यांच्या घरी आला होता.
यावेळी महेशने त्याची दुचाकी त्याच्यां घरी लावुन मावशी अनिता हिस ‘मुबंईचे डॉक्टर संगमनेर येथे येणार असल्याने त्याच्याकडे जाऊन येतो’ असे सांगितले. परंतू बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने संगमनेर शहरासह परिसरात व नातेवाईक यांच्याकडे महेशचा शोध घेण्यात आला, मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे रंगाने सावळा, पाच फुट उंची, अंगात फुल बाह्याचा गुलाबी रंगाचा शर्ट व राखाडी कलरची पँट तसेच पाठीत वाकून चालतो असे वर्णन महेशचे असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याबाबत हारवल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राजेद्रं भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाचा शोध पोलीस घेत असून कोणालाही हा तरुण आढळून आल्यास त्यांनी संगमनेर शहर पोलिसांना याबाबत माहिती द्यावी अशी विनंती कुटुंबियानी केली आहे.