◻️ आश्वी परिसरातील किराणा, हाॅटेल, इतर खाद्यपदार्थ व्यावसायिकानी उपस्थित राहावे
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील किराणा दुकानदार, हाॅटेल चालक, इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गरजेचे असलेल्या अन्न सुरक्षा परवाना (फुड लायसन्स) नोंदणी व नुतणीकरण शिबीराचे आयोजन गुरुवार दि. ९ फ्रेबुरवारी रोजी केले असल्याची माहीती आश्वी व्यापारी असोसिएशनने दिली आहे.
अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षा परवाना (फुड लायसन्स) बंधनकारक असल्याने आश्वी व्यापारी असोसिएशनच्या वतीने अन्न सुरक्षा परवाना (फुड लायसन्स) नोंदणी शिबीराचे गुरुवारी आश्वी बुद्रुक येथिल विठ्ठल मंदिरात आयोजन केले आहे.
दरम्यान यावेळी परवाना काढण्यासाठी येताना सोबत दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड झेरॉक्स, जागेचा उतारा, वीज बील, जुना परवाना असल्यास त्याची झेरॉक्स घेऊन यावी असे आवाहन व्यापारी असोसिएशनच्या वतीने पंकज नाके, योगेश रातडीया, मनोज पटवा, निलेश चोपडा तसेच सर्व सदस्यांनी केले आहे.