◻️ ऊस तोडणी मंजुराच्या कुटुंबातील चिमुकला काळाने हिरावला
◻️अंत्यसंस्कारासाठी मुलाचा मृतदेह मुळगावी हालवला
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस तोडणी मजुराच्या नऊ वर्षीय मुलाचा प्रवरा डाव्या कालव्यात पडल्याने बुडुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. ऊस तोडणी मंजुराच्या कुटुंबातील चिमुकला काळाने हिरावल्यामुळे आश्वी सह परिसरात शोककळा पसरली असल्याची माहिती पत्रकार योगेश रातडीया यानी दिली आहे.
आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्यावरील महादेव पुलालगत असलेल्या शेळके वस्तीवर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी जळगाव जिल्ह्यातील करगाव येथील ऊस तोडणी मंजुर राहत आहेत. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संदीप राठोड पत्नी सह ऊस तोडणीसाठी गेले होते.
यावेळी त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा रितेश संदीप राठोड हा प्रवरा डाव्या कालव्यावर गेला होता. याठिकाणी त्याचा पाय घसरल्यामुळे तो कालव्यात पडला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या तरुणांनी रितेशला कालव्यात पडलेले पाहाताच पाण्यात उड्या मारल्या. शोध घेतल्यानतंर या तरुणानी रितेशला पाण्यातून बाहेर काढत त्याला उपचारासाठी लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान रितेशचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पत्रकार योगेश रातडीया यानी दिली.
दरम्यान उत्तरीय तपासणीनंतर रितेशचा मृतदेह करगाव (जि. जळगाव) या त्याच्यां मुळगावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर ऊस तोडणी मंजुराच्या कुटुंबातील चिमुकला काळाने हिरावल्यामुळे आश्वी सह परिसरात शोककळा पसरल्याचे चित्र असल्याचे पत्रकार योगेश रातडीया यानी कळवले आहे.
विशेष सुचना:-
सध्या थोड्याफार प्रमाणात ऊन चटकण्यास सुरवात झाली असून भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तण सुरु असल्याने कालवे तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे तरुणानी पोहण्यासाठी गेले असता काळजी घेणे गरजेचे असून कालव्यालगत राहणाऱ्या नागरीकानी आपल्या लहान मुलाची काळजी घ्यावी असे आवाहन संगमनेर Live करत आहे.