झालेले राजकारण व्यतीथ करणारे - माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
◻️ प्रदेशाध्यक्षांसोबत काम अशक्य, थोरातांच्या पत्रानतंर प्रदेश कॉग्रेस मध्ये खळबळ

◻️ आ. थोरात यांच्या पत्रामुळे पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार.?

◻️ काँग्रेसमधली अतरगंत धूसफूस उघड

संगमनेर Live | महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद आता अत्यंत विकोपाला गेले आहे. थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती समोर आल्याने प्रदेश कॉग्रेसमधील धूसफूसीनतंर मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजप पर्यत नेऊन पोहोचवले. हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेसच्या विचारावरच आपली वाटचाल झाली असून या पुढील काळातही याच विचारांवर वाटचाल सुरू राहणार आहे असे स्पष्ट सांगताना मागील महिन्यात झालेले राजकारण व्यतीथ करणारे असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने जाणता राजा मैदानावर शिंदेशाही बाणा या कार्यक्रमानिमित्त ऑनलाइन पद्धतीने तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते.

२६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातामुळे खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्यामुळे संगमनेरला येता आले नाही. एक महिनाभर तालुक्यातील जनतेपासून दूर असा जीवनात कोणताच कालखंड नव्हता. संगमनेर तालुका हे आपली कुटुंब असून दर चार दिवस, आठ दिवसातून तालुक्यातील जनतेमध्ये येत प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. विकास कामांमध्ये सहभाग घेत असतो. याचबरोबर संस्थांच्या बैठका घेत असतो. कुटुंबाप्रमाणे तालुक्याचे आपण काळजी घेत असून आतापर्यंत ही वाटचाल यशस्वी झाली असल्याचे ते म्हणाले.

विकासाच्या वाटचालीमध्ये संगमनेर तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात चांगला तालुका म्हणून ओळखला जातो. येथील सुसंस्कृत राजकारण, शांतता सुव्यवस्था, प्रगती यामुळे राज्यातील वरच्या क्रमांकावर असलेल्या तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होत असतो.

नाशिक पदवीधर निवडणूकीबाबत पहिल्यादाच भाष्य करताना आ. थोरात म्हणाले की, मागील महिन्यात झालेले राजकारण हे व्यतिथ करणारे आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. यावर बाहेर बोलले पाहिजे असे नाही या मताचा मी आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर आपण योग्य करू. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. काहींनी भाजपापर्यंत नेऊन पोहोचवले एवढेच नाही तर भाजपाचे तिकीट वाटप सुद्धा केले. काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. असे असले तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत याच विचारांवर वाटचाल सुरू होती. यापुढेही काँग्रेसच्या विचारांवर वाटचाल सुरू राहणार असल्याची ग्वाही आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली असून यापुढील काळातही जनतेने आपल्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन करत विजयी झाल्याबद्दल आ. सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीवरून झालेला घोळ कसा आणि कोणामुळे झाला, आ. तांबे यांनी पुराव्यांसह समोर आणले होते. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस एच. के. पाटील यांनी तांबे कुटुंबातील कोणी निवडणूक लढवायची याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे सांगितले होते. ही निवडणूक सत्यजित तांबे यांनी लढवावी, असा निर्णय तांबे कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र, त्यांना नाशिक पदवीधरऐवजी औरंगाबाद व नागपूर येथील एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यानंतर पाठवलेल्या फॉर्ममध्ये डॉ. सुधीर तांबे यांचे नाव लिहूनच फॉर्म पाठवले गेले, असा खुलासा सत्यजित तांबे यानी पत्रकार परिषदेत केला होता.

त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून सध्याच्या प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणे शक्य नसल्याचे आ. थोरात यानी कळवल्याचे वृत्त प्रसिध्दी माध्यमामध्ये आले आहे. काँग्रेस पक्षात निष्ठेने इतकी वर्षे आपण काय काय काम केले, याचाही थोडक्यात गोषवारा या पत्रात देण्यात आला आहे. आ. थोरात यांच्या या पत्रामुळे पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवणार की, पटोले यांचे खांदे दिल्लीतील त्यांचे 'गॉडफादर' के. सी. वेणुगोपाल अधिक भक्कम करणार, यावर थोरात यांचे काँग्रेस पक्षातील भवितव्य अवलंबून आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !