◻️ महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील राहणार उपस्थित
◻️ मालपाणी लॉन्स येथे दुपारी २ वाजता होणार वितरण
संगमनेर Live | केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून मंजूर झालेल्या १६३५ जेष्ठ नागरीकांना सुमारे १ कोटी रुपयांचे साधन साहित्याचे मोफत वितरण महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बुधवार दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात शासनाच्या व्यक्तिगत लाभाच्या मंजूर झालेल्या योजनांमधील धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने सामाजिक अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून जेष्ठनागरीकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु केली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे नगर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. संगमनेर तालुक्यात यासाठी नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
संगमनेर शहरातील १६३५ जेष्ठनागरीकांना या योजनेतून विविध साहित्य मंजूर झाले आहेत. यासर्व साहित्याचे वितरण शहरातील मालपाणी लॉन्स येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील सहा हजाराहून अधिक जेष्ठ नागरिकांना साधन साहीत्याचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. यापैकी आश्वी घारगाव बोटा आणि निमोण या गटातील लाभार्थींना यापुर्वीच साधन साहीत्याचे मोफत वितरण करण्यात आले आहे.