◻️ चावा घेतल्यामुळे रेबीजची लागण होऊन सहा गायींचा मृत्यू
◻️ संपर्कात आलेल्या सुमारे चाळीस शेतकऱ्याना रेबीज प्रतिबंधक लसीकरण
◻️ शेतकऱ्यासह नागरीकानमध्ये भितीचे वातावरण
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असुन या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीजची लागण होऊन सात गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यासह नागरीकाना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील ट्रक वाहतुक संस्थेचे संचालक शिवाजीराव इलग यांनी केली आहे.
प्रतापपूर गावात रेबीजची लागण झाल्याने सलिम शेख, अनिल गोसावी, आबा सांगळे, ज्ञानेश्वर माळी, हारीभाउ दराडी यांच्या सहा गायींचा मृत्यु झाला असून हौसाबाई बिडवे यांच्या गायीला लागन झाल्याने वेगळे ठेवण्यात आले आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी प्रतापपूर दाढ रस्त्यावरील कुरण परीसरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्रे आणुन सोडण्यात आले. यापैकी रेबिज बाधित असलेल्या कुत्र्यामुळे परिसरातील गायी रेबीज बाधित झाल्यामुळे सोमवारपासून गायी दगावण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यानकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे.
तसेच ऊस तोडणी मंजुर त्यांची मुले व जनावरांना रेबीज बाधित कुत्र्याने चावा घेतल्यास मोठा अनर्थ निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रतापपूरचे सरपंच दत्तात्रय आंधळे, शिवाजीराव इलग यांनी पशुधन विकास अधिकारी डाॅ. बी. आर शिंदे यांच्याशी संपर्क साधला आसता त्यांनी तातडीने प्रतापपूर गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या पशुधनाची तपासनी करत लसीकरण करण्यास सुरवात केली असून निमगावजाळी आरोग्य केद्राचे प्रमुख डाॅ. तांबोळी यांनी संपर्कात आलेल्या सुमारे चाळीस शेतकऱ्याना रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले आहे.
प्रतापपूर व आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीसह उंबरी व मांचीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकाट कुत्र्यांच्या मोठ्या टोळ्या रस्त्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकाना त्रास देत असतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान दुधाळ गायी दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून या शेतकऱ्याना शासनाने आर्थिक मदत करावी असे आवाहन सरपंच दत्तात्रय आंधळे, आ राधाकृष्ण विखे ट्रक वाहतुक सोसायटीचे संचालक शिवाजीराव इलग, डाॅ. बाळासाहेब आंधळे, पांडुरंग आंधळे, किरण आंधळे, गोरक्षणाथ घुगे, गणेश इलग, विकास आंधळे, महेंद्र सांगळे आदिनी केली आहे.