◻️ केंद्राच्या योजनेचा जिल्ह्यातील ४२हजार वृध्दांना लाभ
◻️ योजनाच्या अंमलबजावणीच्या ‘प्रवरा पॅटर्न’चे कौतुक
संगमनेर Live (लोणी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली राष्ट्रीय वयोश्री योजना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील ४२ हजार कुटूबियांपर्यत पोहचवून देशात अव्वल स्थान मिळवून योजनेच्या अंमलबजावणीचा प्रवरा पॅटर्न समोर आणला आहे.
सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास या मंत्राने केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. अंत्योदय हाच केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेचा उद्देश असतो. समाजातील शेवटचा माणूस योजनेचा लाभार्थी व्हावा या उद्देशाने सुरू केलेली प्रत्येक योजना लोकप्रतिनीधी आणि कार्यकर्ते यांनी समाजापर्यत पोहचवावी आशी अपेक्षा असते.
केंद्र सरकारच्या समाजिक अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील ६० वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी साधन साहीत्य मोफत देण्याची ही योजना सुरू झाली. सुरूवातीला योजनेचे महत्व कोणाच्या लक्षात आले नाही. परंतू खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सारख्या जागृत तरुण नेतृत्वाने प्रधानमंत्र्याच्या संकल्पनेतील या योजनेचे सामाजिक दायित्व वेळीच ओळखून संपूर्ण नगर जिल्ह्य़ात योजना राबविण्याचा निश्चय केला.
यापुर्वी देशात अनेक सरकार सतेत होते. परंतू जेष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्रपणे आशा पध्दतीची योजना सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील दुर्लक्षित घटकाला या योजनेचा आधार दिला. योजनेची अंमलबजावणी करताना जेष्ठ नागरीकांवर कोणताही अर्थिक भार येणार नाही याची काळजी घेत फक्त आधार कार्डवर योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रीया केली.
नगर जिल्ह्यात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या योजनेच्या अंमलबजावणी करीता स्वता पुढाकार घेतला. महसूल तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात योजनेचा प्रसार आणी प्रचार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. जेष्ठ नागरिकांना योजनेतील साधन साहीत्य मिळण्याकरीता नोंद करता यावी म्हणून प्रत्येक तालुक्यात जनसेवा फौंडेशन आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनच्या माध्यमातून नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
गावात शहरात कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे वयोश्री योजनेच्या नोंदणी कॅम्पमध्येच हजारो जेष्ठ नागरिकानी विविध साधन साहीत्यांकरीता नोंदणी केली. व्हील चेअर, कमोड खुर्ची, कंबरेचा आणि घुडघ्याचा पट्टा, काठी, चष्मा कानाचे मशिन आशा साहीत्यांसाठी झालेली नोंदणी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतील योजनेचे यश दाखवून देणारे ठरले.
नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थींना मंजूर झालेले साधन साहीत्य पुन्हा थेट गावात जावून देण्यात आले. यासाठी ना कोणता अर्ज ना कोणाची शिफारस होती! केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४२ हजार लाभार्थीनी घेतला.
शासनाची योजना म्हणली की, असंख्य कागदपत्र, शासकीय कार्यालयात चकरा, कोणाचा वशिला आणि एवढे सर्व देवूनही हेलपाटे मारण्याची वेळ आली तर लाभार्थी योजना नको म्हणून दूर जातो. मात्र केंद्र सरकारची मागील आठ वर्षातील कार्यपध्दती पाहीली तर कोणत्याही योजनेचा लाभ थेट लाभार्थींना घरपोच मिळतो किंवा अनुदानाच्या रुपात असेल तर थेट बॅक खात्यातून होतो.
यामुळे भ्रष्टाचार दूरच परंतू योजनेच्या अंमलबजावणीत हलगर्जी पणा सुध्दा नाही. याचे एकमेव कारण योजनेच्या अंमलबजावणीची असलेली सर्व आॅनलाईन प्रक्रीया. राष्ट्रीय वयोश्री योजना सुध्दा पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वाखाली सरकारची एक यशस्वी योजना म्हणून चर्चेत आली आहे. या योजनेमुळे सरकारच्या कार्यपध्दतीचा विश्वास समाजात निर्माण झालाच परंतू यापेक्षाही जेष्ठ नागरीकांना नवा आत्मविश्वास सुध्दा दिला!