संगमनेर Live | भाषा शुध्द किंवा अशुध्द असण्यापेक्षा योग्य अयोग्य असे म्हणणे योग्य ठरेल, कारण प्रांतानूसार देशानूसार एकाच गोष्टीचे नाव वेगवेगळे असते. यासाठी बोली भाषेत बोलली जाणारी भाषा आणि व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक असणारी भाषा यातील फरक समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतातील अग्रगण्य स्टार्ट अप कंपनीचे डायरेक्टर शंतनू खानवेलकर यांनी केले.
इंग्लीश आणि काही परकीय भाषा यांच्या शिक्षणासंदर्भात प्रशिक्षण देणारी सी. के. इन्स्टिट्यूट संस्था चितरंजन कोर्टीकर यांनी सुरू केली. संस्थेच्या पहील्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खानवेलकर यांनी मार्गदर्शन केले. या संस्थेच्या माध्यमातून एका वर्षांत स्पोकन इंग्लिश बिझनेस इंग्लिश आणि आयइएलटीएस मिळून ६६ विद्यार्थ्यांना संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात चितरंजन कोर्टीकर यांनी संस्थेच्या माध्यमातून फ्रेंच जर्मन जापनीज या भाषांसंदर्भात उपलब्ध ऑनलाईन कोर्सेस बाबत प्रेझेंटेशन केले. संस्थेतील १३ विद्यार्थी परदेशात जावून शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, डॉ. जयश्री थोरात, डॉ. लक्ष्मीकांत कोर्टीकर, डॉ. ओंकार कोर्टीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संजय मालपाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आशा संस्थेची संगमनेरात मोठी गरज होती असे स्पष्ट करून चितरंजन कोर्टीकर यांनी अत्यंत प्रभावीपणे ही गरज पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त करून उतम भाषिक संस्कार उच्च अध्यात्मिक मूल्य आणि ज्ञानदान हा पाया असलेला शिक्षकी पेशा आशी या परीवाराची ओळख असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सर्वाचे स्वागत डॉ. ओंकार कोर्टीकर यांनी केले. सूत्रसंचलन सौ. निलांबरी कोर्टीकर यांनी केले. या कार्यक्रमास विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी डॉक्टर्स वकील उपस्थित होते.