◻️ पारंपरिक संबळ वाद्य व तरुण - तरुणीचे लेझीम पथकाने वेधले भाविकाचे लक्ष
◻️ चित्तथरारक टांगा शर्यती व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
संगमनेर LIVE | ‘जय श्रीराम’चा जयघोष, सनई, टाळ व मृदुंगाच्या मधुर स्वरात प्रभु श्री रामचंद्र जन्म महोत्सव संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
आश्वी बुद्रुक येथील पुरातन काळातील प्रभु श्रीराम, बंधु लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे एकत्रीत महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या मंदिरात (राम नवमी) श्री राम जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी सकाळी श्रीराम मंदिरापासुन श्रीरामाच्या पादुका सह पालखी मिरवणूक काढण्यात आली यात अग्रभागी पारंपरिक संबळ वाद्य, तरुण - तरुणीचे लेझीम पथक, भगवे झेंडे घेतलेले तरुण, महिला, पुरुष, पालखी, रथ, टांगा अशी पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीरामा चा जय घोष करत राम मंदिरात पोहचली. या ठिकाणी भजनी मंडळ व महिला मंडळाने भजने जन्म गीते गायली मंदिरा वर आकष॔क विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बारा वाजता राम जन्म झाल्यावर पंजरी (सुठ, धने, गुळ, खोबरे व साखर यांचे मिश्रण) वाटण्यात आले. तर राम भक्त तरुणांकडून लाडूचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
दरम्यान दुपारी चित्तथरारक व डोळ्याचे पारणे फोडणाऱ्या टांगा शर्यतीचे तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायंकाळी भव्य राम जन्म उत्सव मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमधील तरुण व भाविक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.