◻️ आ. सत्यजित तांबे यांची नेवासे येथे प्रहार पदाधिकाऱ्यांसमवेत ‘चाय पे चर्चा’
संगमनेर LIVE | नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांच्या भेंडा येथील गावी भेट दिली.
यावेळी पोटे यांच्या आग्रहस्तव भेंडा गावातील एका छोट्या लहान वयात आपल्या कुटुंबाच्या जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कष्ट करणारा सोमनाथ चव्हाण याच्या चहाच्या टपरीला आ. तांबे यानी भेट दिली. या मुलाची परिस्थिती समजावून घेत आमदार सत्यजित तांबे यांनी भविष्यात काहीही गरज लागल्यास मी निःसंकोचपणे मला संपर्क करा मी नक्की मदत करेल असा शब्द दिला.
जिल्हाध्यक्ष पोटे यांनी याप्रसंगी आ. सत्यजित तांबे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी आ. तांबे यानी प्रहार पदाधिकाऱ्यांसमवेत ‘चाय पे चर्चा’ केली.
दरम्यान याप्रसंगी प्रहारचे किसान आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, रावसाहेब पाटेकर, भेंडा शाखा संपर्कप्रमुख संदीप पाखरे, शाखाध्यक्ष मोतीराम शिंदे, बंडू आरगडे, सौंदळा ग्रामपंचायत सदस्य बबन आरगडे, निलेश आरगडे, नितीन वाबळे, श्याम आरगडे, भारत लोखंडे आधी प्रहार मित्रपरिवार उपस्थित होता.