◻️ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील उपस्थित
संगमनेर LIVE (लोणी) | ढोल ताशांचा गजर.. आकाशात फडकणारे भगवे ध्वज.. अध्यात्माचा जागर.. फटाक्याची अतिषवाजी आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देत भक्तीत तल्लीन झालेले भाविक अशा भक्त्तीमय वातावरणात राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या रामनवमी उत्सव समितीच्या वतीने दाढ बुद्रुक येथे रामनवमी उत्सवानिमित्त बालयोगी बाबाजी महाराज चाळक यांचे किर्तन, ललित कला अकादमी, पुणे यांची भजन संध्या, पहाटे समितीच्या वतीने श्री प्रभुरामचंद्र मुर्ती अभिषेक राहाता तालुका भाजपा युवा मार्चा अध्यक्ष जितेंद्र माळवदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बालयोगी ह. भ. प. बाबाजी महाराज चाळक यांचे किर्तन आणि महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील उपस्थित होत्या. यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक देवीनंद तांबे अँड. भानुदास तांबे, माजी सभापती प्रल्हादराव बनसोडे, अशोकराव गाडेकर, भाऊराव गाडेकर, ह. भ. प. दादा महाराज तांबे, भारत वाकचौरे, माजी सभापती नंदाताई गोरक्षनाथ तांबे, माजी सरपंच पुनमताई योगेश तांबे, अशोक जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी रामनवमी उत्सव समितीचे कार्य नेहमीच समाज उपयोगी राहीले आहे. कोविड काळात २६१ कुटुंबांना अन्नधान्य, किराणा वाटप तसेच कोविड सेंटरला जेवण आणि नाष्टा हे उपक्रम या समितीचे इतरांसाठी दिशादर्शक राहीले आहे. प्रभु रामचंद्राचा विचार घेऊन काम करावे असे सांगितले.
शोभा यात्रेतून ही सामाजिक संदेश दिला. कार्यक्रमयामध्ये नाचणारे घोडे, सोलपुरची हलगी, नाशिक आणि दाढ येथील बॅन्ड पथक, विद्युत रोषणाईने हा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्याचे आभार श्रीराम नवमी उत्सव समिती आणि ग्रामस्थाच्यावतीने युवा कार्यकर्ते अमित बनसोडे यांनी मानले.