◻️ चिंभळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्सहात संपन्न
संगमनेर LIVE (श्रीगोंदा) | वार्षीक स्नेह संमेलनात चिमुकल्याना आपली कला सादर करण्याचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असून त्यातूनच नाव नवीन कलाकार खेडयातून घडतात असे प्रतिपादन भाजपच्या महिला जिल्हा सरचिटणीस अनुजा गायकवाड यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ उत्साहामध्ये पार पडले. त्याप्रसंगी अनुजा गायकवाड बोलत होत्या. गावातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली.
याप्रसंगी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस अनुजा गायकवाड, सरपंच छाया गायकवाड, सुनील गायकवाड, संजय सावंत, दीपक गायकवाड यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी आजच्या युगात प्रत्येक पालकाला वाटते आपला मुलगा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शिकला पाहिजे, पण जिल्हा परिषदेच्या शाळेत आपली मराठी बोली भाषा व आपली संस्कृती कशी जपायची शिकवले जाते, आई वडीलांचा मान सन्मान कसा ठेवायचा हे शिकवले जाते. या जिल्हापरिषद शाळेतूनच नवीन पिढी घडत असल्याचे गौरोउदगार सरचिटणीस अनुजा गाईकवाड यांनी काढले आहेत.