◻️ जेट प्रोपल्शन लॅब मध्ये विद्यार्थी संशोधक म्हणून नियुक्ती
◻️ नासाच्या मंगळ ग्रहावर गेलेल्या यानांमध्ये विसंगती वर संशोधन करणार
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या प्रतिक राजेंद्र रातडीया याची जगप्रसिद्ध अमेरीकेतील नासा या अंतराळ संस्थेत सशोधक म्हणून निवड झाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) मध्ये संशोधक म्हणून नुकतीचं प्रतिक रातडीया यांची निवड झाली असल्याची माहिती मिळाल्याने सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थानी दिली आहे.
प्रतिक रातडीया पुढील तीन महिन्यांसाठी कृत्रिम बुद्धिमते (artificial intelligence) चा वापर करून नासाच्या मंगळ ग्रहावर गेलेल्या यानांमध्ये विसंगती शोधण्याच्या पद्धती विकसित करण्यावर संशोधन करणार आहे. या प्रकल्पासाठी प्रतिकची अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन लॅब मध्ये विद्यार्थी संशोधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान प्रतिक हा राजेंद्र शांतीलाल रातडीया यांचा मुलगा तर आश्वी बुद्रुक येथिल प्रथितयश आदेश्वर उद्योग समुहाचे योगेश रसिकलाल रातडीया, निलेश रसिकलाल रातडीया व सागर अशोक रातडीया यांचे बंधू आहेत. त्यामुळे आश्वी सह पंचक्रोशीतून प्रतिक रातडीया यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.