◻️ बुधवारी रात्री चोरट्याने सातपुते यांच्या घरी केला हात साफ
◻️ २ लाख ३ हजार ५०० रुपयाच्या मुद्देमालात गंठण, राणीहार डोरले व अंगठयाचा समावेश
◻️आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे बुधवारी रात्री चोरट्यानी दत्तात्रय निवृत्ती सातपुते यांच्या घरातून साडेसात तोळे सोन्यासह १६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दत्तात्रय सातपुते यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, उंबरी बाळापूर शिवारातील गट नबंर १३ मध्ये माझे राहते घर आहे. मी २२ मार्च रोजी नांदुर्खी येथे असलेल्या सासुरवाडीला कामानिमित्त गेलो होतो. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास मुलगा राहुल याने घरी चोरी झाल्याची माहिती दिली.
त्यामुळे मी रात्री १.३० वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर सुनाने सांगितले की, रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आम्ही झोपलो होतो. ११.१५ वाजेच्या सुमारास मी पाणी पिण्यासाठी उठले असता काळे कपडे व मास घातलेली व्यक्ती किचनमध्ये उचकापाचक करत होती. त्यामुळे तिने घाबरुन घरातील इतराना जागे केले. घरातील व्यक्ती जागे झाल्याची चाहूल लागल्याने चोरट्याने घरातून काढता पाय घेतला.
यानतंर आम्ही घरातील वस्तूची पाहणी केली असता ७५ हजार रुपये किमंतीचे तीन तोळे वजणाचे सोन्याचे गंठण, ५० हजार रुपये किमंतीचे दोन तोळे वजणाचा राणीहार, २५ हजार रूपये किमंतीचे एक तोळा वजणाचे डोरले, २५ हजार रुपये किमंतीच्या एक तोळे वजणाच्या तीन अंगठ्या तसेच १२ हजार ५०० रुपये किमंतीचे आर्धा तोळा वजणाचे लहान मुलाचे सोन्या चांदीच्या दागिन्याबरोबरचं १६ हजार रुपये रोख रक्कम असा एकून २ लाख ३ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे.
दरम्यान याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास आश्वी पोलीस करत असल्याची माहिती मिळाली आहे.