◻️ तालुक्यातील २ दिव्यांग व्यक्तिंना विवाहासाठी प्रत्येकी ३० हजार रुपयांचे अनुदान
संगमनेर LIVE | जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ३८ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी घेण्याकरीता ४ लाख ९४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर झालेल्या या प्रस्तावांना मंजुरी मिळावी म्हणून विशेष प्रयत्न केले.
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये रोजगाराच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ५ टक्के सेस निधीतून तालुक्यातून पिठाच्या गिरणीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने मंजुरी देण्याबाबत आधिकाऱ्यांना सुचित केले होते. त्यानुसार ३८ लाभार्थ्याना प्रत्येकी १३ हजार रुपयांप्रमाणे ४ लाख ९४ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे.
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तिंच्या विवाहासाठी अनुदान देण्याची योजना आहे. तालुक्यातील २ व्यक्तिंना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे अनुदानही मंजुर झाले आहे.