संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ३० एप्रिलला पत्रकारांसाठी कार्यशाळा

संगमनेर Live
0
◻️ ज्येष्ठ संपादक लेखक सुनील माळी, न्युज 18 लोकमतचे मिलिंद भागवत व जेष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी मार्गदर्शन करणार

◻️ माध्यमासंबंधी पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री 

******

संगमनेर LIVE (संजय साबळे) | श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ३० एप्रिल रोजी पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये विविध माध्यमांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची व्याख्याने होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरक्ष मदने यांनी दिली.

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने केले काही वर्षापासून सातत्याने विविध प्रकारचे उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक लेखक सुनील माळी हे बातमीदारांपुढील आव्हाने आणि प्रिंट मीडियातील बदलते स्वरूप या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. न्युज 18 लोकमतचे मिलिंद भागवत हे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे स्वरूप व त्यापुढील नवी आव्हान या विषयावर बोलणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केलेले जेष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी हे सध्याच्या विविध सामाजिक माध्यमाच्या अनुषंगाने पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्रातील ज्येष्ठ स्तंभलेख, संपादक व प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यशाळा सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी पूर्णवेळ आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विविध माध्यमांच्या पत्रकारांना संयोजकांच्या वतीने लेखन साहित्य, भोजन, अल्पोपहार यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या पत्रकारांसाठी नोंदणी शुल्क १०० रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांसाठी नाव नोंदी अनिवार्य असणार आहे अशी माहिती उपाध्यक्ष गोरक्ष नेहे यांनी दिली.

कार्यशाळेच्या दिवशी महाराष्ट्रातील विविध पत्रकार संपादक यांनी लिहिलेल्या माध्यमासंबंधीच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री व्यवस्था करण्यात आले असल्याची माहिती सचिव संजय अहिरे यांनी दिली.

पत्रकार शाळेसाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी नोंदणी करावी असे आवाहन प्रकल्प समितीच्या वतीने नितीन ओझा, शाम तिवारी, संदीप वाकचौरे, आनंद गायकवाड, शेखर पानसरे, मंगेश सालपे, सतीश आहेर, सचिन जंत्रे, सुशांत पावसे, अंकुश बुब, सोमनाथ काळे, सुनील महाले ,भारत रेघाटे, अमोल मतकर, काशिनाथ गोसावी, धिरज ठाकूर, हरीभाऊ दिघे, संजय साबळे, नीलिमा घाडगे आदींनी केले आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !