◻️ भगवान महावीर यांचा जयधोष करत काढलेल्या भव्य शोभा यात्रेने वेधले सर्वाचे लक्ष
◻️ ह. भ. प. संदीप महाराज देशमुख व ह. भ. प. जलाल महाराज सैय्यद यांचे व्याख्यान
संगमनेर LIVE (योगेश रातडीया) | जैंन धर्माचे चोवीसवे तिर्थकर भगवान महावीर स्वामी जन्मकल्यान महोत्सव संगमनेर तालुक्यातील आश्वीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील जैन श्रावक संघाच्यावतीने जैन धर्माचे चौवीसवे तिर्थकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त गावातुन ‘जिओ और जिने दो, अहिंसा हमारा नारा है मानव धर्म प्यारा है। भगवान महावीर स्वामी की जय चा जयधोष करीत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
जैन धर्म स्थानकात अहिंसा ध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर भगवान महावीर स्वामीच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर भव्य शोभायात्रेला सुरवात झाली. अग्रभागी पारंपरिक वाद्य व लाला साड्या परीधान केलेल्या महिला, अहिंसा रथ, भगवान महावीर व जैन साधुचा भुमिकेतील मुल व मुली, सफेद वस्त्र परिधान केलेली पुरुष अशी शिस्तबद्ध शोभायात्रा मारुती मंदिर प्रागंणात आली असता तेथे आनंद भक्ती मंडळाचा तरुण तरुणीनी भगवान महावीरांचा संपुर्ण जीवनावरील पथ नाट्या व्दारे अहिंसेचा संदेशाची शिकवण दिली मिरवणुकीचा समारोप विठ्ठल मंदिरात झाला.
याठिकाणी ह. भ. प. संदीप महाराज देशमुख, ह. भ. प. जलाल महाराज सैय्यद यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी मांची हिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर, विजयराव हिंगे, अँड. रोहीणीताई किशोर निघुते, उपसरपंच राहुल जऱ्हाड, जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे यांनी जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाऊराव कांगुणे, राजेंद्र गायकवाड, बाळकृष्ण होडगर, सुम्मतीलाल गांधी, धन्नराज गांधी, प्रकाश मुथ्था, निलेश चोपडा, विलास भंडारी, प्रकाश मुथ्था, चंपालाल बोरा, संजय गांधी, पंकज नाके, पंकज कोळपकर, स्वप्नील लुंकड, अनिल पितळे, कैलास बिहाणी, अभिजीत गांधी, राजेंद्र लुणीया, ईश्वर भंडारी, अभिजित बिहाणी, योगेश रातडीया, सुम्मतीलाल रातडीया, वसंत गांधी, प्रशांत गांधी, मनोज पटवा, भगवान बोरा, आश्वीन मुथ्था, राजेंद्र भंडारी, प्रकाश गांधी, योगेश लुंकड, पपलेश लाहोटी, समीर गांधी, अमित गांधी, अमित भंडारी, निलेश रातडीया, विनित गांधी, नितीन गांधी, सागर रातडीया, केदार बिहाणी, बाळुजी बिहाणी, दिपक बोरा, प्रितम गांधी, किरण गांधी, नंदकिशोर लाहोटी, रोहित भंडारी तसेच अहिंसा प्रेमी नागरीक उपस्थित होते.
दरम्यान यावेळी गौतमप्रसादीचे आयोजन अमरचंद स्वरुपचंद गांधी यांच्या वतीने करण्यात आले होते. स्वागत जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी प्रास्ताविक सुशील भंडारी यांनी केले. यावेळी पुणे, लोणी, राहुरी, संगमनेर, वांबोरी व अहमदनगर येथील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.