◻️ पायरेन्स येथे वार्षिक पारितोषिक कार्यक्रम संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | जीवनात यश अपयशाचे आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात याप्रसंगी आपला आत्मविश्वास प्रबळ ठेवला तर आपण प्रतिकूल परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. तुमची गुणवत्ता आणि तुम्ही केलेले परिश्रम हेच तुमच्यासाठी यशाची दारे उघडतात प्रवरेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांचे कर्तृत्व सिद्ध होत आहे हेच स्वप्न पद्यश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील यांचे होते ते पुर्ण होतांना विशेष आनंद होतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि संस्थेच्या विश्वस्त सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोणी पायरेन्सच्या आयबीएम या संस्थेमध्ये उडान २०२३ आणि वार्षिक पारितोषिक वितरण स्नेहसंमेलन कार्यक्रमात सौ. शालीनीताई विखे पाटील बोलत होत्या. संचालक डॉ. निलेश बनकर, आय. बी. एम. ए. चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी, महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी विशाल विखे, प्रा. ऋतुजा कोतकर, प्रा. प्रमोद बोऱ्हाडे, प्रा. पूजा परजणे, प्रा. ऋषिकेश धर्माधिकारी, प्रा. धनंजय बोऱ्हाडे, प्रा योगेश आहेर, प्रा. रेणुका तनपुरे, लेखाधिकारी श्री अमोल शिरसाठ, कार्यालयीन अधीक्षक रावसाहेब कानडे, महेंद्र खर्डे आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या प्रवरा शैक्षणिक संकुलामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले. भारतातच नव्हे तर परदेशात अनेक उच्च पदांवर संस्थेचे विद्यार्थी कार्यरत आहे. विद्यार्थ्याचे मिळविलेले उज्वल यश आणि प्रगती हीच खरी संस्थेची संपत्ती आहे. पुस्तकी ज्ञाना पेक्षा अनुभवी ज्ञान कधीही श्रेष्ठ आहे. विद्यार्थ्यानी आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करून आपले कर्तृत्व सिद्ध करावे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवरा समूह कधीही तत्पर राहील असेही सौ. विखे पाटील म्हणाल्या.
यावेळी सुभाष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी आपले व आपले चरित्र सांभाळावे आई-वडिलांची सेवा करावी व्यसनांपासून दूर राहावे आपल्या मातृभाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यावेळी विविध क्षेञात निविण्यपुर्ण यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा गौरव मान्यवरांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय. बी. एम. ए. चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी वारुळे आणि कल्याणी गोल्हार या विद्यार्थ्यानीने केले.