◻️ पेमगिरी येथे हनुमान मंदिरासमोर बसविलेल्या देशातील सर्वात मोठ्या ३० फुटी गदेचे लोकार्पण
◻️ सोहळ्याला अभिनेता देवदत्त नागे, शिवचरित्रकार नामदेव जाधव, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात उपस्थित
संगमनेर LIVE | शहागडाला स्वराज्य संकल्प भूमी बनविण्याचे हाती घेतलेले काम वाखण्याजोगे आहे. या शहागडाच्या विकासासाठी जी शासकीय मदत लागेल ती मिळवून देऊ आणि आपण सर्वजण मिळून शहागड चा विकास करून पर्यटनस्थळ उभे करू असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावचे भूमिपुत्र आणि उद्योजक रोहित दुबेयांच्या संकल्पनेतून पेमगिरी गावातील आकर्षक केलेल्या हनुमानाच्या मंदिरासमोर बसविलेल्या देशातील सर्वात मोठ्या ३० फुटी हनुमानाच्या गदेचे लोकार्पण अभिनेता देवदत्त नागे, शिवचरित्रकार नामदेव जाधव, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, अकोले तालुक्याचे आ. डॉ किरण लहामटे, माजी आ. सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी आ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, रोहित डुबे, त्यांच्या पत्नी कविता डुबे, सरपंच द्वारका डुबे, सोमनाथ गोडसे, शांताराम डुबे, रावसाहेब डुबे, संजय डुबे, संदीप डुबे, अर्चना वनपत्रे, मनीषा गोडसे, अँड. स्वप्निल कोल्हे, शुभम कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री आ थोरात म्हणाले की, आपण बाहेर गेलो असलो तरी मी माझ्या गावासाठी काही तरी वेगळे करू शकतो ही उदात्त भावना मनात ठेवून उद्योजक रोहित डुबे यांनी आपल्या गावातदेशातील सर्वात मोठी तीस फुटी हनुमानाची गदा उभी करून पेमगिरीला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम केले आहे.
जय मल्हार मालिकेचे अभिनेते देवदत्त नागे म्हणाले की, सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात पुस्तक वाचनापासून तरुण पिढी दूर होत चालली आहे. त्यामुळे मोबाईल बरोबरच तरुण पिढीने पुस्तकालाही तेवढेच महत्त्व देत वचनवाढ वावे असाही सल्ला देत तरुणांनी व्यसन मुक्त व्हावे. असा सल्ला जय मल्हार फिल्म अभिनेते पेमगिरीच्या तरुण पिढीला दिला.
आपल्या गावात जे प्रेम मिळते ते प्रेम बाहेर गेल्यानंतर कुठेच मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या गावाविषयी प्रेम आणि आपुलकी असणे गरजेचे आहे. ही आपुलकी रोहितडुबेयांनी जपली असल्यामुळे देशातील सर्वातमोठी ३० फुटी गदा बसविण्याचा निर्णय घेतला ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
आ. किरण लहामटे म्हणाले की, पेमगिरीची शहागड व वडामुळे एकवेगळी ओळख निर्माण झाली आहे आणि आता देशातील सर्वात मोठी गदा सुद्धा या गावातच उभी राहिली आहे. आता अल्पवधीतचं स्वराज्य संकल्प भूमी म्हणून रायगड व राजगडाबरोबरच शहागडावर सुंदर शिल्प साकारणार आहे. त्यातून पर्यंटन वाढणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, तुम्ही जर वाईट वागले तर ही हनुमानाची गदा तुमचा नक्कीच कार्यक्रम करतील त्यामुळे शिस्तीला जपा आणि वाईट कृत्य करू नका. व्यसनमुक्ती करा आणि गावातील मुलांना चांगले शिक्षण द्या असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी पेमगिरी गावाची ऐतिहासिक ओळखीबरोबरच सेंद्रिय आणि विषमुक्त शेती करणारे वेगळे गाव म्हणून अशी ओळख निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवचरित्रकार नामदेव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत शहागड ही स्वराज्याची संकल्प भूमी करण्याचा ध्यास पिमगिरीकरांनी मनात आणला आहे. त्याचे मी कौतुक करतो असे त्यांनी सांगितले.
बजरंग बलीचे प्रतीक ही हनुमनाची गदा आहे असे प्रतीक उभे केले तर मनस्थिती बदलते आणि त्यातून परिस्थिती बदलते. प्रभु रामचंद्रांच्या पुढे हनुमानराया शस्तीने उभे राहिले. तसे पेमगिरी गाव हे शिस्तीने उभे राहिल आहे. पेमगिरीमध्ये गदा दिली अल्पवधीत शहागडावर शहाजीराजांचे स्मारक उभारण्याचा आपण संकल्प केला आहे. तो संकल्प लवकरच पूर्ण करणार असून स्वराज्य संकल्प भूमी म्हणून या शहागडाचा विकास करणारा असल्याचे उद्योजक रोहित दुबे यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितले.