◻️ राम मंदीराचे निर्माण ही कोट्यावधी भारतीयांची स्वप्नपूर्ती
◻️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समवेत दौऱ्यात सहभागी करून घेतल्याचा आनंद
संगमनेर LIVE (लोणी) | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आयोध्येकडे रवाना झाले आहेत.
राज्यात शिवसेना भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहीलाच आयोध्येचा दौरा आहे. या दौऱ्यात भाजपाच्या नेत्यांनीही सहभागी व्हावे आशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून आयोध्येच्या दौर्यात सहभागी होण्याची विनंती केली.
महसूल मंत्री विखे पाटील यांनी सोलापूर येथील नियोजित कार्यक्रम पूर्ण करून लखनौकडे रवाना झाले.
दरम्यान आयोध्येमध्ये राम मंदीराचे होत असलेले निर्माण ही कोट्यावधी भारतीयांची स्वप्नपूर्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होत असलेले प्रभू श्रीरामांचे मंदीर हे भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक अस्मितेचे प्रतिक आहे. प्रभू श्रीरामांचे दर्शन आणि मंदीर निर्माणाचे सुरू असलेले काम पाहाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समवेत या दौऱ्यात सहभागी करून घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया ना. विखे पाटील यानी व्यक्त केली.