◻️ नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे सभासद, शेतकरी व ग्रामस्थासह पंचक्रोशीतून अभिनंदन
संगमनेर LIVE | अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात जुन्या तसेच शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आश्वी खुर्द सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी ज्ञानेश्वर प्रभाकर खर्डे यांची तर व्हा. चेअरमन पदी भास्कर पांडुरंग वाल्हेकर यांची निवड झाल्याने सभासद, शेतकरी व ग्रामस्थानी नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन केले आहे.
रविवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. निवडणूक अधिकारी दिलीप चतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा सायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमन पदाची सूचना रमेश शिवाजी सोनवणे यांनी मांडली व तिला दत्तात्रय बापूसाहेब गायकवाड यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हा. चेअरमन पदाची सूचना विजय माधवराव भोसले यांनी मांडली तिला प्रशांत नीलकंठ कोडोंलिकर यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे सर्वानुमते चेअरमन पदी ज्ञानेश्वर प्रभाकर खर्डे यांची तर व्हा. चेअरमन पदी भास्कर पांडुरंग वाल्हेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी जेष्ठ संचालक विठ्ठलराव गायकवाड, राजेद्रं मांढरे, प्रशांत कोडोलीकर, दत्तात्रय गायकवाड, विजय भोसले, स्नेहलकुमार भवर, भाऊसाहेब शिदें, सौ. सुरेखा प्रकाश गायकवाड, सौ. शोभाताई बाळासाहेब गायकवाड, राजेंन्द्र मुन्तोडे, विठ्ठलराव वर्पे तसेच माणिक भवर, प्रकाश गायकवाड, सुरेश गायकवाड, सुभाष मांढरे, डॉ. रंगनाथ भुसाळ, मोहन गायकवाड, विनायक दातीर, सुरेश भडकवाड, सर्जेराव गायकवाड आदि उपस्थित होते.
दरम्यान राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जेष्ठ नेते आण्णासाहेब भोसले, कारखाण्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, अँड. अनिल भोसले, माजी जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई किशोर निघुते, कांचनताई मांढरे, सरपंच म्हाळू गायकवाड सेवा सोसायटीचे सभासद, शेतकरी व ग्रामस्थासह पंचक्रोशीतील नागरीकाकडून नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन होत आहे.