◻️ आश्वी सह पंचक्रोशीतून गौरववर अभिनदंनाचा वर्षाव
◻️ युनियन बँक आँफ इंडियाच्या कृषी क्षेत्र अधिकार पदी होणार नियुक्ती
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल गौरव अजय ब्राम्हणे याने पहिल्याचं प्रयत्नात बँकींग क्षेत्रात यश संपादन केले असून त्याची युनियन बँक आँफ इंडियाच्या कृषी क्षेत्र अधिकार पदी नियुक्ती होणार असल्यामुळे आश्वी सह पंचक्रोशीतून त्याच्यावर अभिनदंनाचा वर्षाव होत आहे.
गौरव ब्राम्हणे याचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हापरिषदेच्या शाळेत झाले आहे. तर त्याचे कृषी पदवी शिक्षण श्रमशक्ति कृषी महाविद्यालय मालदाड येथे झाले असून एम. एस. सी. अँग्रीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले आहे. गौरवने बँकींग क्षेत्रात करियर करण्याची जिद्द मनाशी बाळगत इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) या बँकींग कर्मचारी निवड संस्थेने घेतलेल्या परिक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. त्यामुळे युनियन बँक आँफ इंडियाच्या कृषी क्षेत्र अधिकार पदी त्याची निवड झाली आहे. यासाठी आपल्याला राहुरी येथिल कृषी मित्र एकता मंच यांचे विशेष मार्गदर्शन मिळाल्याची माहिती गौरवने दिली आहे.
दरम्यान गौरव हा आश्वी बुद्रुक येथिल सामाजिक कार्यकर्ते अजय ब्राम्हणे यांचा सुपुत्र तर प्राथमिक शिक्षक अरुण ब्राम्हणे यांचा पुतण्या आहे. गौरवच्या या यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. राजेद्रं विखे पाटील यांच्या सह पंचक्रोशीतील जेष्ठासह विविध मान्यवर व ग्रामस्थानी अभिनंदन करुन गौरवला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.