◻️ संगमनेर बालगृहातील मुलाना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप
◻️ रिपाईचे तालुकाध्यक्ष अशिष शेळके व त्याच्या सहकाऱ्याचा महामानवाच्या जयंती दिनी अभिनव उपक्रम
संगमनेर LIVE | महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने डीजे, मिरवणूक व रोशनाई यासारख्या गोष्टीसाठी होणाऱ्या खर्चाला फाट देत शहरातील बालगृह (रिमांड होम) तील अनाथ व गरजू मुलांना शालेय साहित्य तसेच मिठाई वाटप करून अनोख्या पद्धतीने महामानवाचा जयंती उत्सव साजरा केला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी शिक्षण व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याची भावना रिपाईचे तालुकाध्यक्ष अशिष शेळके व त्याच्यां सहकाऱ्यानी व्यक्त केल्या असून यावेळी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसडूत वाहत असल्याचे चित्र पाहून खऱ्या अर्थाने महामानवाला अभिवादन केल्याची भावना तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची झाली होती. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान हा सामाजिक उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मुन्तोडे, तालुका सचिव जनार्दन साळवे, संघटक मधुकर सोनवणे, अँड. रवी शेळके, पप्पू रोकडे, विजय मुन्तोडे, रोहिदास उंडे,
शिबलापुरचे उपसरपंच दिलीप मुन्तोडे, रमेश भोसले, महिला तालुकाध्यक्ष रुपालीताई सोनवणे, सागर शिंदे, संपत भोसले, सिद्धार्थ खरात, शरद जमदाडे, आत्माराम आडंगळे, रवी रोकडे, योहान मिसाळ, राजू वाघमारे, विकास गायकवाड, प्रकाश वाघमारे, रवींद्र शेळके, अशोक शेळके, दिनकर शिंदे, सनी लोंढे, प्रतीक शेळके, अभिषेक शेळके, ऋतिक शेळके आदीसह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.