◻️ आश्वी पोलीस ठाणे येथे महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मानवदंना
◻️ आश्वी बुद्रुक येथिल भव्य मिरवणूकीने वेधले लक्ष
◻️ प्रतापपूर, पानोडी, उंबरी बाळापूर, शेडगाव, हंगेवाडी, शिबलापूर, दाढ, ओझर आदि गावानमध्ये महामानवाला अभिवादन
संगमनेर LIVE (योगेश रातडीया) | संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमधील सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायती तसेच शाळामध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली आहे.
यामध्ये आश्वी बुद्रुक येथे भीमा कोरेगाव च्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या शौर्यस्तंभासमोर सकाळी बुद्ध व भिम वंदनेनंतर ‘जय भीम’चा जयधोष करत पारंपारिक पद्धतीने वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावातील सर्व तरुण, तरुणी तसेच महिला व पुरुषानी पाढरे वस्त्र व निळ्या रंगाची मफलर अंगावर परीधान करत ‘जय भिम’च्या घोषणानी परिसर दुमदुमत होता. या मिरवणूकीनंतर प्रवरा नदीच्या काठा वर भीमसैनिकांनी वृक्षारोपण करत सामाजिक दायित्व पार पाडत महामानवाला अभिवादन केले.
याप्रसंगी आश्वी बुद्रुक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, प्रथम लोकनियुक्त सरपंच महेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गायकवाड, प्रशांत कोळपकर, गणेश गायकवाड, असलम शेख, मंगेश गायकवाड, निलेश त्रिभुवन, सनी साठे, गणेश गायकवाड, मनोज साळवे, रोहित गायकवाड, सोमेश गायकवाड, वंचितचे राजेंद्र गायकवाड, अजय ब्राम्हणे, सुनील गायकवाड, नानासाहेब गायकवाड, अरुण ब्राम्हणे आदीसह भिम सैनिक व ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
दरम्यान आश्वी पोलीस ठाणे येथे महामानवाला पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार, गोपनिय विभागाचे विनोद गंभिरे आदिसह पोलीस कर्मचाऱ्यानी अभिवादन केले.
तसेच प्रतापपूर, पानोडी, उंबरी बाळापूर, शेडगाव, हंगेवाडी, शिबलापूर, दाढ, ओझर आदि गावानमध्येही जयंती दिनी स्थानिक ग्रामस्थं व मान्यंवरानी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले असून आश्वी खुर्द येथे सांयकाळी काढण्यात आलेल्या समाज प्रबोधनपर सुदंर मिरवणूकीची पंचक्रोशीत उशीरापर्यत चर्चा सुरु होती.